आज नवीन वर्षाचा पहिला दिवस. हा दिवस साजरा करण्यासाठी प्रत्येकजण आपआपल्या योजना आखतात. लोक ३१ डिसेंबरच्या रात्री त्यांच्या मित्रांसोबत कुठेतरी जाण्याचा किंवा कोणाच्या तरी घरी थांबून पार्टी करण्याचा विचार करतात आणि त्यांची पार्टी दुसऱ्या दिवशी म्हणजे १ जानेवारीच्या सकाळपर्यंत चालू असते. दरम्यान, फूड अॅग्रीगेटर झोमॅटोची मालकी असलेल्या ब्लिंक इटच्या ग्राहक चॅटवर बोलत असताना एका व्यक्तीने आपली व्यथा शेअर केली, ज्याचा स्क्रीनशॉट ब्लिंक इटने स्वतः सोशल मीडियावर शेअर केला आहे. ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. काय लिहिलं होतं त्यात जाणून घ्या…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

quiziframe id=19 dheight=282px mheight=417px

स्क्रीनशॉटमध्ये काय आहे?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट व्हायरल होत आहे जी ब्लिंक इटने त्याच्या अधिकृत हँडलवरून केली आहे. या पोस्टमध्ये ब्लिंक इट कर्मचारी आणि ग्राहक यांच्यातील संभाषणाचा स्क्रीनशॉट आहे. ब्लिंक इटमध्ये आकाश नावाच्या स्टाफ सदस्याने ग्राहकाला विचारले, मी तुम्हाला कशी मदत करू? प्रत्युत्तरात, ग्राहक लिहितो, ‘मी तुमच्या अॅपवरून नवीन वर्षाच्या पार्टीसाठी चिप्स आणि ड्रिंक्सची ऑर्डर दिली पण ऑर्डरमध्ये काहीतरी गहाळ आहे.’ हे वाचताच, ब्लिंक इट वरून एक संदेश आला, ‘ऑर्डरमधून काय गहाळ आहे ते सांगू शकाल का?’ याला उत्तर म्हणून ग्राहकाने म्हटले, “पार्टी करण्यासाठी मित्र” आणि अनेक रडणाऱ्या चेहऱ्याचे इमोजी पोस्ट केले. त्यानंतर ग्राहकाने डिलिव्हरी रायडर पार्टी करण्यासाठी थांबू शकतो का, याची चौकशी केली. यानंतर आकाशकडून कोणतेही उत्तर आले नाही.

(हे ही वाचा : आनंद महिंद्रा व्यक्तीची अचंबित करणारी कला पाहून थक्क; ‘तो’ Video शेअर करत म्हणाले, “माझा एकच प्रश्न…” )

व्हायरल पोस्ट येथे पहा

लोकं काय म्हणाले?

Blink It ने पोस्टला कॅप्शन दिले, ‘आकाशने चॅट सोडला.’ ही पोस्ट लिहिपर्यंत १ लाख ८२ हजार लोकांनी ती पाहिली आहे. पोस्ट पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले, “आकाशने चॅट पार्टीमध्ये सहभागी होण्यासाठी सोडून दिला.” तर दुसर्‍या युजरने लिहिले, “हे विनोदापेक्षा जास्त दुःखद आहे. इथे माझ्यासारखे बरेच लोकं आहेत, ज्यांनी पार्टीसाठी गोष्टी घेतल्या आहेत पण त्यांच्यासोबत पार्टी करायला कोणी नाही.” या पोस्टला लोकांनी अशाप्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blinkit posts hilarious conversation between a customer and care executive on new years eve pdb