Guinness World Record Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, याचा अंदाज लावणं कठीण आहे. रस्त्यावरून जाताना ट्रकसारखी अवजड वाहने खड्ड्यात अडकल्यावर या वाहनांना बारेह खेचण्याची वाहनचालक क्रेन किंवा ट्र्र्रॅक्टरची मदत घेतात. पण एका पठ्ठ्यानं चक्क त्याच्या दातांनीच तब्बल १५,७३० किलो वजनाचा ट्रक ओढून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्याच्या ताकदीला सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी सलाम ठोकला आहेच, पण त्याने दाखवलेल्या अभूतपूर्व टॅलेंटसाठी त्याची गिनीज वर्ड रेकॉर्डमध्येही नोंद झालीय. इजिप्त देशात राहणारा आशरफ सुलीमानचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. गिनीज वर्ड रेकॉर्डच्या पेजवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला असून सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

अशरफला दातांनी ट्रक ओढताना पाहून रस्त्यावरील लोकांना धक्काच बसला

आशरफचा हा अप्रतिम व्हिडीओ गिनीज वर्ड रेकॉर्डच्या इन्स्टाग्रामवर पेजवर शेअर करण्यात आला आहे. ” अशरफ सुलीमानने दाताने 15,730.0 kg (34.678.714lbs)चे अतिशय जड वाहन चक्क दातानेच ओढले.” असं कॅप्शनही या व्हिडीओला देण्यात आलं आहे. याचसोबत काही हॅशटॅगही या व्हिडीओला देण्यात आले आहेत.#strengthtraining या हॅशटॅगचाही या व्हिडीओत समावेश करण्यात आला आहे. अशरफने हा विक्रम इजिप्तमध्ये १३ जून २०२१ केला असल्याची माहिती गिनीज वर्ड रेकोर्डच्या ब्लॉगवर देण्यात आलीय. अशरफचा हा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान गाजला असून २४ हजारहून अधिक लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. तसेच नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षावही या व्हिडीओवर केला आहे.

Container hits eight vehicles including police car on Chakan Shikrapur road Pune
Video: चाकण शिक्रापूर मार्गावर कंटेनरची पोलिसांच्या मोटारीसह आठ वाहनांना धडक; पोलीस कर्मचारी, लहान मुलगी जखमी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
What Happened Used Onion And Chutney In Hyderabad Amritsar Haveli Restaurant Shocking Food Video
हॉटेलमध्ये उष्ट्या कांदा आणि लोणच्याचं काय होतं माहितीये? VIDEO पाहून तुमच्याही पायाखालची जमिन सरकेल
Crime
Crime News : कर्माचे फळ! अपघातानंतर मृत्युशी झुंजणाऱ्या व्यक्तीला तसंच सोडलं… बाईक घेऊन पळालेल्या तिघांचाही अपघात
Shocking video pune A Guy in Car attacked by 3 Youths on Scooter Pune street video goes viral
पुण्यात गुंडगीरी संपेना; कार चालकाचा पाठलाग केला शिवीगाळ केली अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा या तरुणांचं करायचं काय?
Shocking video man caught stealing bra panties in Bhopal video goes viral
बापरे आता तर हद्दच पार केली! चोर आला महिलांचे वाळत घातलेले अंतर्वस्त्र घेतले अन्…VIDEO पाहून येईल संताप
Vloggers Surprise Blinkit Swiggy Delivery Riders With Gifts
एक ही दिल है, कितनी बार जीतोगे! ‘त्यांनी’ डिलिव्हरी बॉयला दिले हटके गिफ्ट; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Viral Video Drunk Man Pinned Down By Ticket Checker Train Attendant Flogs Him
“लाथा-बुक्या मारल्या, अन् पट्ट्याने धू धू धूतले! तरुणीला छेडणाऱ्या मद्यधुंद व्यक्तीला टीसी आणि ट्रेन अटेंडंटने दिला चोप, Video Viral

इथे पाहा व्हिडीओ


एका नेटकऱ्याने या व्हिडीओला प्रतिक्रिया देत म्हटलंय, “भाऊ, डेंटिस्ट कोण आहे, मला हा डेंटिस्ट शोधायची गरज आहे.” तर दुसऱ्या एकाने म्हटलं, “हा निव्वळ वेडेपणा आहे, एव्ढची शक्ती त्या माणसाने कुठून आणलीय?”. “भाऊचे दात मसल्स आहेत”, असंही एका नेटकर्याने म्हटलं. तर अन्य एक नेटकरी म्हणाला, त्याचे दात माझ्या हातांपेक्षा खूप मजबूत आहेत.” अशरफच्या या व्हिडीओनं सोशल मीडियावर तमाम नेटकऱ्यांनी मनं जिंकली आहेत. जबरदस्त विक्रमाला गवसणी घातल्याने नेटकरी अशरफवर कौतुकाचा वर्षावही करत आहेत. अशक्य असलेली गोष्ट शक्य करुन दाखवल्याने अशरफवर संपूर्ण जगभरातून स्तुतीसुमनं उधळली जात आहेत.

Story img Loader