Bodybuilder Bride Video Viral : सोशल मीडियावर लग्नसमारंभाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी नवरा-नवरीची धमाकेदार एन्ट्री तर कधी वरातीतील जबरदस्त डान्स तर कधी काही आश्चर्यकारक गोष्टी लक्ष वेधून घेतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहिल्यानंतर तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत एक नवरी आपली जबरदस्त बॉडी दाखवताना दिसतेय. तिची ती बॉडी पाहून उपस्थित पाहुणे मंडळीदेखील अवाक् होतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओत एका नवरी मेकअप रुममध्ये मेकअप करताना दिसतेय. पण, तिचा मेकअप जरी नवरी मुलगीसारखा असला तरी तिची बॉडी मात्र सामान्य मुलींसारखी नाही, तिने जिम करून मजबूत बॉडी बनवली आहे. साडी आणि अंगावर दागिने घालून ती नवरीप्रमाणे नटलीय. यावेळी ती कधी बायसेप्स दाखवते, तर कधी ट्रायसेप्स दाखवताना दिसतेय. तिची ती बॉडी पाहून लग्नात उपस्थित पाहुणे मंडळीदेखील घाबरतील असे काही जण म्हणतायत. कारण एखाद्या पुरुष बॉडीबिल्डरलाही लाजवेल अशी बॉडी तिने बनवलीय, ज्यासाठी तिने खूप मेहनत घेतलीय; पण नवरी मुलीची अशी बॉडी पाहून अनेक जण आश्चर्य व्यक्त करतायत. व्हिडीओतील तरुणी नेमकी कोण आहे आणि हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप समोर आलेलं नाही, परंतु तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

बॉडीबिल्डर नवरी मुलीचा हा व्हिडीओ @bhojpuri_duniya486 नावाच्या इन्स्टाग्रामवर अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर अनेक जण विविध कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिले की, “आजच्या सुनेचा लूक पाहून, सासरचे लोकही घाबरतील.” दुसऱ्याने लिहिले की, “ती सूनेपेक्षा बाहुबली अधिक दिसतेय.” तिसऱ्याने लिहिले की, “सासू आणि वहिनी चुकूनही हिच्याशी भांडणार नाहीत.” शेवटी एकाने लिहिले की, “त्यांना शस्त्रे हवीत, अलंकार नकोत.”