रणवीर सिंग हा बॉलीवूडमधील सध्याचा सर्वांचा लाडका अभिनेता आहे. त्याचा अभिनय आणि तडफदार नृत्यापासून ते त्याच्या चित्रविचित्र ‘फॅशन सेन्स’पर्यंत सर्व गोष्टींसाठी तो प्रसिद्ध आहे. मात्र, सध्या तो एका वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत आलेला आहे. ती गोष्ट म्हणजे, लैंगिक आरोग्यासंबंधी [sexual wellbeing] केलेली जाहिरात. मात्र, या जाहिरातीला नेटकऱ्यांनी एवढे व्हायरल किंवा डोक्यावर का बरे उचलून घेतले आहे ते पाहू.

ही जाहिरात एखाद्या हिंदी मालिकेप्रमाणे बनवण्यात आली आहे. यामध्ये रणवीर सिंगसह, जॉनी सीन्स असल्याचेही आपल्याला पाहायला मिळते. जॉनी सीन्स हा अमेरिकन पॉर्नस्टार आहे. त्यामुळे या हिंदी जाहिरातीत त्याला पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या जाहिरातीमध्ये जॉनी सीन्सची बायको त्याच्याबरोबर लग्न करून सुखी नसल्याचे रणवीर सिंगला सांगते. त्या दोघांचे लग्न वाचवण्यासाठी रणवीर सिंग त्यांच्या समस्येवर उपाय म्हणून जॉनी सीन्सला लैंगिक आरोग्य सुधारण्याची गोळी देतो.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Funny video The Little Girl Requests Alexa To Use Abusive Language But She Receives A Funny Reply Video Goes Viral
VIDEO: “Alexa शिव्या दे ना…”, चिमुकलीच्या विनंतीवर अ‍ॅलेक्साने दिलं जबरदस्त उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल
Navri Mile Hitlerla actress dance on Kishore kumar Eena Meena Deeka song watch video
Video: ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील कलाकारांचा किशोर कुमार यांच्या ‘या’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो

हेही वाचा : तुम्ही ‘Unhealthy relationship’ मध्ये आहेत का? हे ओळखण्यासाठी ‘या’ चार टिप्स लक्षात ठेवा…

पुरुषांचे लैंगिक आरोग्य सुधारणाऱ्या गोळीची ही जाहिरात असल्याचे सर्वात शेवटी आपल्याला समजते. मात्र, अभिनेता रणवीर सिंगने ही जाहिरात सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर प्रचंड प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. इतकेच नव्हे तर अनेकांनी यावर तऱ्हेतऱ्हेचे मिम्सदेखील बनवलेले आहे. नेटकरी यावर नेमके काय म्हणतात ते पाहू.

“हे काय पाहिलं मी!! रणवीर सिंग एकता कपूरच्या मालिकांमध्ये कसा दिसेल याबद्दल मी विचार केला होता. पण, जॉनी सीन्सचा तर मी स्वप्नातही विचार केला नव्हता”, असे एकाने लिहिले आहे. दुसऱ्याने, “याचे अजून एपिसोड्स कुठे आहे? मला किमान १० सीजन तरी हवे आहे!” असे म्हटले आहे. तिसऱ्याने, “मजा मस्करी करत खूप महत्वाचा संदेश रणवीर सिंगने समाजात पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.” असे लिहिले आहे.

एक्स [पूर्वीचे ट्विटर] या सोशल मीडियावर जाहिरातीचा व्हिडीओ शेअर करत नेटकऱ्यांनी दिलेल्या काही प्रतिक्रिया पाहा :

अभिनेता रणवीर सिंगने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंट वरून या जाहिरातीचा व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओला आत्तापर्यंत १३.४ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तर जाहिरातीवर ५४८K लाईक्स आणि २६.६K कमेंट्स आलेल्या आहेत.

Story img Loader