शनिवारी टोक्यो ऑलिम्पिक २०२० ला सुरुवात होताच, बॉलिवूडची अभिनेत्री आलिया भट्ट हिने स्पर्धेसाठी गेलेल्या भारतीय टीमला शुभेच्छा दिल्या. तिने या शुभेच्या तिच्या इस्टाग्राम अकाऊटवरून स्टोरीच्या ऑप्शनवर एक फोटो टाकत दिल्या. पण हा फोटो २०२० टोक्यो ऑलिम्पिकचा नसल्यामुळे आलिया प्रचंड ट्रोल झाली. ती अधूनमधून तिच्या व्यक्तव्यामुळे, फोटोमुळे किंवा अन्य गोष्टींमुळे ट्रोल होत असते आणि चर्चेतही असते. यामध्ये आता अजून एका पोस्टची भर पडली आहे. यावर नेटीझन्सने भन्नाट प्रतिकिया नोंदवल्या आहेत. तिच्या त्या स्टोरीचा स्क्रीन शॉट सगळीकडे व्हायरल झाला आहे.कोविड-१९ मुळे पाठच्या वर्षीचे ऑलिम्पिक पुढे ढकलेले गेले होते.
काय होती पोस्ट?
अभिनेत्री आलिया भट्ट हिने शनिवारी इस्टाग्रामवर टोक्यो ऑलिम्पिक गेम्स २०२० च्या ऐवजी २०१२ लंडन समर ऑलिम्पिकचा फोटो शेअर केला. हा फोटो शेअर करतांना तिने टोक्यो २०२१ हा हॅशटॅग वापरला. मधुरा हनी या भारतीय महिलेकडे त्यावेळी भारतीय पथकाचा गेटक्रॅश होता आणि उद्घाटन समारंभावेळी अॅथलीट्सबरोबर ती चालत गेली होती. भट्टने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती लाल जॅकेट आणि निळी जीन्स घातलेली दिसली.
फोटोमधील सुशीलकुमार
नेटिझन्सने त्या फोटोमधील ग्रुपमध्ये उपस्थित असलेल्या अॅथलीट्सपैकी एक पैलवान सुशील कुमार आहे हे बरोबर नोटीस केलं. सुशील कुमार सध्या खुनाच्या आरोपाखाली तुरूंगात आहे. हा फोटो बघून नेटीझन्स म्हणाले की “सुशील कुमारचा फोटो टाकला आहे?”, “हा माणूस सुशील कुमार सध्या खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये आहे” “आलियाने टोक्यो ऑलिम्पिक २०२० मध्ये सुशील कुमारलाही पोहचवलं” अशा प्रतिक्रिया दिल्या.
दरम्यान टोक्यो ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी भारताची पदककमाई मिराबाई चानू यांच्यामुळे झाली. वेटलिफ्टिंगमध्ये चानू यांनी रौप्यपदक जिंकत ‘रौप्यक्रांती’ घडवली. चानूने ४९ किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई करीत देशाचे पदकांचे खाते उघडले. तसेच बॉक्सर मेरी कोमने अंतिम १६ मध्ये प्रवेश केला आहे. मेरी कोमने हर्नांडिज हिला ४-१ ने पराभूत केलं.