गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. युक्रेनी सेनादेखील रशियन सेनेला तोडीस तोड उत्तर देत आहे. अशा परिस्थितीत रशियन सैन्याचा मुकाबला करण्यासाठी सरकारने देशातील जनतेला मोलोटोव्ह कॉकटेल पेट्रोल बॉम्ब (Molotov cocktail Petrol Bomb) बनवण्याचे आवाहन केले आहे. हा बॉम्ब युक्रेनच्या लोकांचे संरक्षण करेल. दरम्यान, युक्रेनमधील एका बिअर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी बिअरऐवजी मोलोटोव्ह कॉकटेल पेट्रोल बॉम्ब बनवण्यास सुरुवात केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ल्विव्ह हे युक्रेनमधील एक ऐतिहासिक शहर आहे, जे पोलंड सीमेजवळ आहे. रशियन सैन्य हे शहरसुद्धा नष्ट करू शकते अशी भीती युक्रेनच्या जनतेला आहे. अशा परिस्थितीत रशियन सैन्याला प्रत्युत्तर देण्यासाठी प्रवदा ब्रुअरीच्या कर्मचाऱ्यांनी बीअरऐवजी मोलोटोव्ह कॉकटेल बॉम्ब बनवण्यास सुरुवात केली आहे. बॉम्ब बनवल्याची माहितीही कंपनीच्या मालकाने आपल्या फेसबुक अकाउंटवरही दिली आहे.

Ukraine-Russia युद्धाच्या पार्श्वभूमीवर गुगलची मोठी कारवाई; रशियाच्या ‘या’ अ‍ॅपवर घातली बंदी

प्रवदा ब्रुअरीचे मालक युरी झस्ताव्हनी यांनी मोलोटोव्ह कॉकटेल पेट्रोल बॉम्बबद्दल बोलताना सांगितले की “कोणीतरी करावे म्हणून आम्हीच हे करत आहोत. आमच्याकडे कौशल्य आहे. आम्ही २०१४ साली रस्ते क्रांतीतून गेलो होतो.” क्रेमलिन-समर्थित शासन उलथून टाकणाऱ्या कीवच्या पाश्चिमात्य समर्थक उठावाच्या संदर्भात युरी झस्ताव्हनी यांनी हे सांगितले. ते म्हणाले की तेव्हा आम्ही मोलोटोव्ह कॉकटेल बनवले होते.

युरी झस्ताव्हनी पुढे म्हणाले की, हे बनवण्याची कल्पना त्यांना एका कर्मचाऱ्याकडून आली. २०१४ च्या क्रांतीमध्ये त्यांच्या अनेक कर्मचाऱ्यांनी भाग घेतला होता. युरी झस्ताव्हनी यांनी हे युद्ध जिंकण्यासाठी सर्व काही करण्याची शपथ घेतली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bombs are being made in ukraine beer factory to fight russia pvp