Book my show crashed due to coldplay concert tickets memes viral: लोकप्रिय बॅंड कोल्डप्लेचा (coldplay) कॉन्सर्ट लवकरच मुंबईत पार पडणार आहे. या कॉन्सर्टच्या तिकिटांची विक्री ‘बुक माय शो’ या अ‍ॅपद्वारे आज (रविवार, २२ सप्टेंबर २०२४ रोजी) दुपारी १२ वाजल्यापासून सुरू करण्यात आली होती. परंतु, कोल्डप्लेची प्रसिद्धी आणि फॅन फॉलोईंग पाहता, भारतीयांची तिकीट बुक करण्यासाठी मोठ्या संख्येने झुंबड उडाली होती आणि त्यामुळे अचानक बुक माय शो हे अ‍ॅप क्रॅश झाले.

तिकीट बुकिंगचे हे प्रसिद्ध अ‍ॅप अचानक बंद पडल्यामुळे सोशल मीडियावर याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आणि नेटकऱ्यांनी बुक माय शो अ‍ॅपवर अनेक मीम्स शेअर करण्यास सुरुवात केली. आता X (पूर्वीचे ट्विटर), फेसबुक, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडियावर कोल्डप्लेमुळे बुक माय शोचे अ‍ॅप क्रॅश झाले, अशी मीम्स व्हायरल होत आहेत.

व्हायरल मीम्स

व्हायरल झालेल्या या मीम्समध्ये हिंदी मालिकेतील गोपी बहूचे मीम्स जास्त व्हायरल होतायत. त्यात गोपी बहू लॅपटॉप धुताना दिसतेय. ‘बुक माय शोचा मुख्य अभियंता’, असं कॅप्शन या मीमला देण्यात आलं आहे.

तर रेल्वे तिकिट बुक करण्यासाठी प्रसिद्ध असणारं IRCTCशी तुलना करून एक मीम व्हायरल केलं जात आहे.

चक्क स्विगीनेही या मीम स्पर्धेत भाग घेतला आणि लिहिलं, “तुम्ही जेवणचं ऑर्डर करा, कारण इथे काहीच क्रॅश होणार नाही. #coldplay”

“कोल्डप्ले तर सोडाच पण चित्रपटाची तिकिटदेखील बूक नाही होत आहे.” अशा कॅप्शनसह अनेक मीम्स व्हायरल होत आहेत.

एवढंच नाही तर काही नेटकऱ्यांनी भारतीय क्रिकेट संघ विश्वचषक जिंकून जेव्हा मुंबईला परतला तेव्हा मरीन ड्राईव्हवरील जी गर्दी झाली होती त्या गर्दीचा फोटो शेअर करत “The waiting line at BookMyShow today” असं कॅप्शन दिलं आहे.

तब्बल नऊ वर्षांनंतर कोल्डप्ले बॅंड भारतात कॉन्सर्टसाठी परतणार आहे. त्यामुळे भारतातील अनेक चाहते त्यांची आतुरतेने वाट पाहतायत.

दरम्यान, नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियम येथे कोल्डप्लेचा हा कॉन्सर्ट १८ व १९ जानेवारी २०२५ रोजी पार पडणार आहे. बुक माय शो अ‍ॅपवर दाखविल्याप्रमाणे या कॉन्सर्टची सगळ्यात कमी किंमत २,५००, तर याची सगळ्यात जास्त किंमत ३५,००० इतकी आहे.