Farmer viral video: शेतीसाठी पाणी हा एक आवश्यक घटक असल्यामुळे पाण्याचा स्त्रोत मुबलक प्रमाणात उपलब्ध असणे हे शेती उत्पादनाच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण बाब आहे. याकरिता शेतामध्ये प्रामुख्याने विहिरी व बोअरवेल खोदले जातात.आपण पाहतो की बरेच शेतकरी जेव्हा शेतामध्ये विहीर किंवा बोअरवेल खोदायचा निर्णय घेतात तेव्हा त्यांच्या समोर सगळ्यात अगोदरचा प्रश्न पडतो तो कोणत्या ठिकाणी आपल्या जमिनीत पाणी असेल याचा. कारण जमिनीतील पाण्याचा नेमका शोध लावणे व त्याच ठिकाणी विहीर किंवा बोरवेल खोदायला घेणे हे आर्थिक दृष्टिकोनातून नुकसान होऊ नये याकरिता खूप महत्त्वाचे आहे. मात्र एकदा का जर पाणी लागलं की मग शेतकऱ्याचा आनंद गगनात मावत नाही. अशाच एका शेतकऱ्याच्या बोरला पाणी लागलं आणि त्याच्या आनंदाला पारावारच उरला नाही. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या सर्वांना जे गोड पाणी मिळतंय ते पावसाचं हे तर सगळ्यांना माहिती असेलच. हे पाणी जमिनीवर पडतं आणि काही जमिनीत मुरतं, काही जमिनीवरून उताराच्या दिशेने वाहून जातं. जमिनीत मुरणारे पाणी मातीच्या विविध थरांतून खाली जातं, मुरूम आणि दगडाच्या अनेक थरांतून खाली जातं आणि शेवटी बरचसं पाणी तळाच्या कातळापर्यंत पोहोचतं. इथून, कातळाच्या काही ठिकाणी असलेल्या सूक्ष्म भेगांमधून जेमतेम १०-१२ टक्के पाणी अजून खाली जातं. असं पाणी शेकडो वर्षं मुरून जमा झालेलं असतं. बाकी पाणी कातळावर जमून विविध थरांमध्ये पसरतं, ज्याला आपण भूगर्भातील पाण्याची पातळी म्हणतो. ही विविध ठिकाणी भूगर्भ, माती, उतार, पाऊस वगैरे गोष्टींवर अवलंबून असल्याने वेगळी असू शकते. बोअरवेल करताना जोपर्यंत कातळ लागत नाही, तोपर्यंत केसिंग पाईप टाकतात. आणि कातळ लागल्यावर त्यात ड्रील करून खाली गेलेल्या १०-१२ टक्के पाण्याचा शोध घेतला जातो.

अशाच एका शेतकऱ्याच्या बोरला अखेर पाणी लागलं आणि सर्वांनी आनंद साजरा केला. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बोर खोदायचं काम सुरु आहे आणि अचानक बोरला पाणी लागतं. यावेळी शेतकरी निश्चिंत होतो आणि त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि आनंद तुम्ही पाहू शकता.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> रस्ता क्रॉस करताना पळू नका; महिलेची एक चूक अन् जोरदार धडक, अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

हा व्हिडीओ shetkarii_brand नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला लाखो व्ह्यूज गेले असून नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया यावर देत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bore well drilling in farm farmers happy reaction goes viral on social media srk
Show comments