तुम्हीही त्या लोकांपैकी एक आहात का? ज्यांना ऑफिसमध्येही झोप लागते. बऱ्याचदा आपण तयारी करून घाईगडबडीमध्ये ऑफिसला जातो. पण ऑफिसमध्ये गेल्यानंतर आपल्याला झोप येते किंवा थकवा जाणवू लागतो. समोर कामाचा कितीही लोड असला तरीही झोप आवरता येत नाही. ऑफिसमध्ये झोपणं वा डुलकी काढणं तुम्हीही रोखू शकत नाही.
प्रत्येक कार्यालयाचे स्वतःचे नियम आणि काही कायदे असतात. तेथे काम करताना कर्मचाऱ्यांना त्यांचे पालन करावे लागते. प्रत्येक कार्यालयात वेगवेगळे नियम असू शकतात, परंतु प्रत्येक कार्यालयात एक नियम आहे. या नियमानुसार, तुम्ही ऑफिसमध्ये झोपू शकत नाही. तरीही, कधीकधी असे घडते की, एखादी व्यक्ती खूप थकलेली असते किंवा त्याला पुरेशी झोप लागत नाही, म्हणून तो ऑफिसमध्ये झोपतो. ऑफिसमध्ये झोपायला लागल्यास तुमची नोकरी धोक्यात येईल. पण हा व्हिडिओ तुम्हाला वाचवू शकतो. एका व्यक्तीचा असा जुगाड पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल. पाहा नेमकं काय घडलं…
(हे ही वाचा : VIDEO: लग्नात नवरदेवाला हार्ट अटॅक, स्टेजवरच कोसळला अन् अवघ्या काही सेकंदात…थरारक Video आला समोर )
व्वा काय कल्पना आहे
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे जो तुम्हाला उपयोगी पडू शकतो. खरंतर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ऑफिसमध्ये एक व्यक्ती झोपलेली असताना दुसरी व्यक्ती तिथे आली आणि त्याला उठवते. डोळे मिटून ती व्यक्ती त्याला थोडा वेळ थांबायला सांगते. काही वेळाने तो झोपलेला माणूस हात जोडून नमस्कार करतो आणि डोळे उघडतो आणि त्याला कामासाठी विचारतो. दुसऱ्या व्यक्तीला वाटते की तो प्रार्थना करत होता, असे समजून तो तिथून निघून जातो. या व्हिडिओमध्ये कॅप्शन लिहिले आहे की, “जेव्हा बॉस तुम्हाला झोपेत पकडतो पण घाबरु नका, तुमच्याकडे प्लॅन बी आहे.”
येथे पाहा व्हिडिओ
व्हिडिओ व्हायरल झाला
हा व्हिडिओ @HasnaZaruriHai नावाच्या पेजने मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (पूर्वी Twitter) वर शेअर केला आहे. वृत्त लिहेपर्यंत ५० हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले, चांगली कल्पना आहे, आम्हीही असचं करू. तर दुसर्या युजरने विचारले आहे की, झोपताना कोणी घोरले तर? अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया लोकांनी मांडल्या.