Viral video: सोशल मीडियावर रोज किती तरी व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात. काही व्हिडीओंना मोठ्या आवडीने शेअरही केले जाते. सध्या तर एक अतिशय मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. काही लोक इतक्या विचित्र पद्धतीने डान्स करतात की पाहूनच अजब वाटतं. तर काही अशाप्रकारे डान्स करतात की पाहतच राहावंस वाटतं. दरम्यान एका तरुणाने इतका भन्नाट डान्स केला आहे की त्याचा डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. एखाद्या तरुणीलाही लाजवेल असा हा डान्स या तरुणानं केला आहे. यावेळी त्याच्याबरोबर असलेली गर्लफ्रेंडही त्याचा हात सोडून पळाल्याचं दिसत आहे.
सध्या डान्स करण्यामध्ये फक्त मुलीच नाही तर मुले देखील पुढे आहेत. सोशल मीडियावर मुलांचे अनेक डान्स व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. असाच या तरूणाचा डान्स करताना व्हिडिओ व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा व्हिडीओ एका ‘क्लब’ मधला आहे. क्लब म्हटलं तर तिथे तरुण मुलं-मुली नवीन गाणी लावून डान्स इंजॉय करतात. तसचं तिथे नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट ‘स्त्रि २’ या चित्रपटातले “आज की रात मजा हुस्न का लिजीये” हे गाणे लावले होते. या गाण्यावर हा तरुण थिरकला. फक्त थिरकलाच नाही तर तो डान्स करताना अप्रतिम स्टेप्स करताना व्हिडीओत दिसला. तसेच त्यानं केलेले हावभावही पाहण्यासारखे आहेत. दरम्यान यावेळी या तरुणाचा डान्स पाहून त्याच्या बरोबर असलेली गर्लफ्रेंडही शॉक झाली आणि त्याचा हात सोडून बाजूला गेली. कारण त्याच्या सारख्या स्टेप्स तिलाही जमत नव्हत्या. मात्र बाजूला उभी राहून ती त्याला प्रोत्साहन देताना दिसत आहे. हा तरुणही एखाद्या प्रोफेशनल डान्सर सारखा डान्स करताना दिसत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> “जास्त गर्व करू नये कारण…पैसा, सौंदर्य, ताकद प्रत्येकाला मर्यादा” सिंहाचा VIDEO पाहून कळेल आयुष्य म्हणजे काय
सोशल मीडियावर हा व्हिडीओ gajender_gajju या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे.नेटकऱ्यांच्या व्हिडीओवर तुफान प्रतिक्रिया येत आहेत. हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून अनेकांनी व्हिडीओला लाईक आणि शेअर केलं आहे.