सोशल मीडियाच्या दुनियेत कधी काय व्हायरल होईल हे सांगणे कठीण आहे. येथे दररोज भरपूर व्हिडीओ असतात जे व्हायरल होत असतात. यातील काही इतके आश्चर्यकारक असतात की तुम्ही विचारात पडाल तर काही इतके मजेदार असतात की तुम्हाला पोट धरून हसायला भाग पाडावे लागेल. सध्या सोशल मीडियावर एका मुलाचा डान्स व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मुलगा आणि मुलगी रस्त्यावर आनंदाने नाचताना दिसत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खरं तर, नृत्य हा एखाद्याचे विचार आणि भावना व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. त्याहीपेक्षा मोकळेपणाने नाचण्यात खूप मजा येते. लोक काय म्हणतील याचा विचार करूनच ते आपली पावले मागे घेतात. पण काही लोक याचा विचार न करता बिनधास्त आपल्याला हवं ते करतात. आता समोर आलेला हा व्हिडीओ बघा, जिथे एक मुलगा आणि मुलगी मध्यरात्री रस्त्यावर नाचत आहेत. त्यांचा डान्स बघितल्यावर तुमचा दिवस जाईल.

( हे ही वाचा: स्टीव्ह जॉब्सच्या मुलीने iPhone 14 सीरिजची उडवली खिल्ली; इन्स्टाग्रामवर शेअर केले मीम्स)

येथे जोडप्याचा जबरदस्त डान्स पाहा

( हे ही वाचा: MP News: १५ महिन्यांच्या चिमुकल्यासाठी जखमी आईची वाघाशी झुंज! थेट त्याच्या जबड्यातून केली मुलाची सुटका)

व्हिडीओमध्ये तुम्ही एक मुलगा आणि मुलगी एका सुनसान रस्त्यावर नाचताना पाहू शकता. मध्यरात्री स्ट्रीट लाईटच्या खाली हे जोडपे मनसोक्त नाचताना दिसत आहेत. दोघेही नाचताना कशाचीच पर्वा न करता मनसोक्तपणे नाचत आहेत. दोघांचा डान्स पाहत राहावा असं वाटत आहे. तुम्ही देखील हा व्हिडीओ पाहिला नसेल तर नक्की पाहा. तुमचा दिवस बनून जाईल.

हा व्हायरल व्हिडीओ @prernadaga21 नावाच्या अकाऊंटवरून ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. बातमी लिहेपर्यंत १.७४ लाखांहून अधिक लोकांनी ती पाहिली असून कमेंट करून त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. एका युजरने लिहिले की, ‘मला कधीच समजले नाही की लोक इतका जबरदस्त डान्स कसा करतात.’ त्याचवेळी, आणखी एका युजरने लिहिले की, इतका अप्रतिम डान्स करणं नक्कीच खूप अवघड आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Boy and girl dancing joyfully empty street at night delights the internet gps