लोकांमध्ये अनेकदा भांडणे होतात. कधी कधी छोट्या छोट्या गोष्टींवरूनही लोक एकमेकांशी भांडतात. अशा अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील किंवा पाहिल्या असतील. याशिवाय ट्रेनमध्ये जागेसाठी झालेली भांडण किंवा मारहाण याचे देखील अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. परंतु तुम्ही कधी शालेय विद्यार्थ्यांना विंडो सीटसाठी एकमेकांना मारहाण करताना पाहिले आहे का? होय, आजकाल असाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे , जो पाहिल्यानंतर तुमचाही थरकाप उडेल. निव्वळ विंडो सीटसाठी झालेले हे भांडण हाणामारी पर्यंत पोहोचले.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, स्कूल बसमध्ये एक मुलगी मुलाची कॉलर पकडून त्याच्या पायाने लाथा मारण्याचा प्रयत्न करते आहे. या दरम्यान तो मुलगा तिच्यापासून स्वत:ला सोडवण्याचा प्रयत्न करतो, पण नंतर त्याचा संयम सुटतो आणि मुलीच्या दोन-चार कानाखाली मारतो. पण बदल्यात त्यालाही मुलीकडून कानशिलात लगावली जाते. जरी त्यांचे भांडण काही सेकंदांनंतर संपले तरी ते पुन्हा चिडतात आणि एकमेकांना पुन्हा भयंकर मारायला लागतात. खिडकीच्या सीटसाठी शालेय विद्यार्थ्यांमध्ये अशी मारामारी तुम्ही क्वचितच पाहिली असेल.

( हे ही वाचा: लग्नातील पाहुण्यांचे कृत्य पाहून अचानक बंद करावा लागला कारंजा; नेमकं काय घडलं पाहा हा Viral Video)

हाणामारीचा व्हिडिओ एकदा पाहाच

( हे ही वाचा: घरी बनवलेल्या मटणावरून झालं नवरा बायकोच भांडण; शेजारी मिटवायला आले अन् जे झालं ते भयंकर…)

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @gharkekalesh नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे. ३९ सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत ६२ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर २ हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईकही केले असून विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Story img Loader