विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटातील गाणी, पोस्टर, ट्रेलर, टिझर सर्वच चर्चेत होतं. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळला. तसेच अनेक समीक्षकांनी या चित्रपटाची स्तुती केली. चित्रपट येऊन एक महिना झाला तरी अजून या चित्रपटाची आणि त्याच्या गाण्याची क्रेझ कायम आहे. अजूनही चंद्रा या प्रसिद्ध गाण्यावर लोक रील्स, व्हिडीओ बनवून पोस्ट करताना दिसत आहेत. असाच एक चंद्रा गाण्यावर भन्नाट डान्स करत असलेल्या मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक छोटा मुलगा चंद्रा गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तो चंद्रा गाण्यावरच्या हुक स्टेप्स हुबेहूब करताना दिसत आहे. त्याच्या आजूबाजूला असलेली लोकही त्याच मनोबल वाढवताना आणि त्याच्या या अप्रतिम डान्सच कौतुक करताना दिसत आहेत. अवघ्या ३० सेकंदाच्या या व्हिडीओने सगळ्याच लक्ष वेधलं आहे.
(हे ही वाचा: Viral Video: …अन् क्षणार्धात खाली कोसळला पूल; उद्घाटनावेळी घडला अपघात)
(हे ही वाचा: लडाखला जाऊन ‘ही’ चूक करू नका! नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आत्तापर्यंत १.५० कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल)
नेटीझन्सच्या प्रतिक्रिया
अनेकांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हजारो नेटीझन्सने हा व्हिडीओ पहिला आहे, अनेकांनी यावर कमेंट्सही केल्या आहेत. या लहान मुलाच्या डान्सच सगळेच कौतुक करताना दिसत आहेत.