जुगाड हा शब्द कोणालाही नवीन नाही. एखादी अशक्यप्राय गोष्ट शक्य करण्यासाठी अनेक जण विविध जुगाड करत असतात. एखाद्या गोष्टीने काम अडत असेल निराश न होता त्यावर पर्याय शोधून काम मार्गी लावण्यात भारतीय खूपच हूशार आहेत. अशा देसी जुगाडचे अनेक व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. सध्या असाच एक देसी जुगाडचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधला देसी जुगाड पाहून बडे बडे इंजिनीअर देखील हैराण झाले आहेत. या देसी जुगाडची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे.
एखाद्या कामासाठी बुलडोझर मागवायचा म्हटलं तर खर्च आलाच. काहींना हा खर्च करणं आवाक्याबाहेरचं असतं. परंतु सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा म्हणाल, “याला म्हणतात जुगाड”. एका लहान मुलाने जे करून दाखवलंय त्यापुढे मोठमोठे इंजिनीअर सुद्धा फेल झाले आहेत. कारण या लहान मुलाने चक्क लाकडी काठ्यांपासून बुलडोझर बनवलाय. होय. यावर तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही. बुलडोझर बनवण्यासाठी किती मोठ-मोठ्या मशीन्स लागतात आणि या मुलाने केवळ लाकडी काठ्यांपासून बुलडोझर कशी काय बनवली? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर याचं उत्तर जाणून घेण्यासाठी तुमची उत्सुकता वाढली असेल. म्हणून तुमची उत्सुकता आणखी न वाढवता हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.
आणखी वाचा : हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये हत्ती फिरताना दिसले, VIRAL VIDEO एकदा पाहाच!
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : हिजाब घालून ओणम साजरा करणाऱ्या विद्यार्थिनींचा VIDEO VIRAL
या लहान मुलाने लाकडी काठ्यांपासून तयार केलेल्या या बुलडोझरमध्ये चिखल काढण्यासाठी आवश्यक यंत्रणा सुद्धा त्याने तयार केलीय. इतकंच काय तर खऱ्या बुलडोझर प्रमाणे मुलाला बसण्यासाठी आणि चालवण्यासाठी जागा देखील दिसून येतेय. हा व्हायरल व्हिडीओ कोणत्या ठिकाणचा आहे, हे अद्याप कळू शकले नाही. पण त्याचा हा जुगाड पाहून आमच्याप्रमाणेच तुम्हालाही नक्कीच आकर्षित करेल.
आणखी वाचा : मुंबई पोलीस अधिकारी आणि चिमुकलीचा हा क्यूट VIRAL VIDEO एकदा पाहाच!
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येतोय. या व्हिडीओवर साहजिकच नेटिझन्सच्या भरभरून प्रतिक्रिया आल्या आहेत. काही लोक हा व्हिडीओ पाहून आश्चर्य झाले आहेत. तर काही यूजर्स मुलाच्या टॅलेंटचं कौतूक करताना दिसत आहेत.
आणखी वाचा : Kala Chashma गाणं परदेशातही हिट, आफ्रिकन भावंड किली आणि नीमाचा नवा VIDEO VIRAL
engineering_i0 नावाच्या एका ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. लोकांना हा व्हिडीओ इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला २ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तर ५६ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय.