Viral video: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे आपण पुन्हा पुन्हा पाहतो. सोशल मीडियावर सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच रील्स बनवत असतात.सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. वेगवेगळ्या डान्सचे तर अनेक व्हिडीओ या मंचावर शेअर केले जातात. सध्या एका चिमुकल्याचा असाच एक मजेदार आणि मूड फ्रेश करणारा डान्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अशोक सराफ यांची मुख्य भूमिका असलेला ‘गंमत जंमत’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. १९८७ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटातील ‘अश्विनी ये ना’ हे गाणं त्याकाळी विशेष गाजलं. इतकंच नाही, तर आजही हे गाणं प्रेक्षकांच्या ओठांवर गुणगुणताना दिसतं. विशेष म्हणजे, हल्लीच्या पिढीलाही हे गाणं तितकंच भावतं. अशातच एका चिमुकल्यानं यावर भन्नाट असा डान्स केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही या चिमुकल्याचे फॅन व्हाल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकला आपल्या बाबांच्या कारमध्ये अशोक मामांच्या ‘अश्विनी ये ना’ या गाण्यावर जबरदस्त नाचत आहे. फक्त नाचत नाही तर तो आनंद घेत घेत नाचत आहे. यावेळी त्याच्या बाजूच्या सीटवर बसलेले त्याचे बाबाही हसताना दिसत आहेत. चिमुकल्याचा हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला की तो थेट अशोक मामांपर्यंत पोहचला. या व्हिडीओवर स्वत: निवेदिता सराफ यांनी प्रतिक्रिया देत, “खूप छान बाळा मी हा व्हिडिओ अशोकना दाखवला आणि त्यांना खूप आवडला” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडिओ kakade.sanjay या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ २० लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेकांनी त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकानं म्हंटलंय, “मला मुलगा झाला तर असाच हवा” दुसऱ्या एकानं “अस्सल मराठी नाणं, कसं खणखणीत आहे, याच उत्तम उदाहरण…” अशी प्रतिक्रिया दिलीय. तर आणखी एकानं, “खूप छान….आजची जनरेशन ही गाणी ऐकते आणि मनसोक्त enjoy करते..अजून काय पाहिजे”