शाळा, कॉलेजमध्ये विविध कार्यक्रम आयोजिक केले जातात ज्यामध्ये विद्यार्थी सहभागी होतात आणि आपल्या कौशल्य दाखवतात. कोणाला चांगले गाता येत तर कोणाला चांगले नाचता येते. काही लोकांचे कौशल्य असे असते की जे सर्वांना आश्चर्यचकित करते. सध्या असाच शाळेमच्या कार्यक्रमात डान्स करणाऱ्या विद्यार्थ्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तरुणाने इतका जबरदस्त डान्स केला आहे लोक त्याचे फॅन झाले आहेत.
तरुणाचा बेशरम रंग गाण्यावरील डान्स व्हिडीओ व्हायरल
पठाण चित्रपटातील गाणे ‘बेशरम रंग’ वर एका तरुणाने डान्स केला आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या या गाण्याच्या डान्स स्टेप्स इतक्या अवघड आहे भल्या भल्यांना त्या करता आल्या नाही. पण या तरुणाने दीपिका पादुकोण प्रमाणेच डान्स स्टेप्स केल्या आहे. त्याचा डान्स पाहून तुम्ही दीपिकाचा डान्स विसरून जाल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ @gauravsitoula_ नावाच्या अकांउटवर शेअर केला आहे ज्याला पाच लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. काही लोक कौतूक करत आहे तर काही लोक टिका करत आहे.
हेही वाचा – आईची लिपस्टिक घेऊन चिमुकलीने रंगवले टॉयलेट! गोंडस व्हिडीओ पाहून लोकांना आठवले त्यांचे बालपण
व्हिडीओवर लोकांनी जबरदस्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एकाने लिहिले की, “तरुणाच्या डान्सवर अनेकजण चूकीची कमेंट करत आहेत पण तो एक चांगला डान्सर आहे.” तर दुसऱ्याने लिहिले की, “तो आपल्या कलेमध्ये पारंगत आहे आणि त्याचा सन्मान आणि कौतुक केले पाहिजे पण शाळा हे योग्य स्थान नाही. पण हा काही अपराध नाहीये.” आणखी एकाने लिहिले की, “या तरुणाचा डान्स पाहून म्हणू शकतो की, आमची मुलं मुलींपेक्षा कमी नाहीत.”
हेही वाचा – लेकीसह वडिलांनी केला भन्नाट डान्स! मजेशीर व्हिडीओ पाहून लोक म्हणाले, “काका तुम्ही तर….”
एकजणाने लिहिले की, “हा तर दीपिका पादूकोणला टक्कर देऊ शकतो.” तर दुसऱ्याने, “मुलगा टॅलेंडेट आहे पण त्याला योग्य संधी मिळण्याची आवश्यकता आहे.”