Viral video: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे आपण पुन्हा पुन्हा पाहतो. सोशल मीडियावर सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच रील्स बनवत असतात.सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. वेगवेगळ्या डान्सचे तर अनेक व्हिडीओ या मंचावर शेअर केले जातात. सध्या एका चिमुकल्याचा असाच एक मजेदार आणि मूड फ्रेश करणारा डान्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अलीकडे ही लहान मुले-मुलीं जरा जास्त टॅलेंटेड आहेत असे म्हणायला हरकत नाही. आता डान्स सारख्या गोष्टींमध्ये विशेष म्हणजे लावणी करण्यात फक्त मुलीच नाही तर मुले देखील पुढे आहेत. मुले देखील लावणीवर मस्त असे एक्सप्रेशन देत नृत्य करतात. यामध्ये फक्त मोठी मुलेच नाही तर लहान चिमुकले सुद्धा आपले टॅलेंटने लोकांची मने जिंकतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर एका चिमुकल्याचा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या चिमुकल्याने चंद्रा या लोकप्रिय लावणीवर असा ठुमका धरला आहे की, पाहणारे हैराण झाले आहेत. चंद्रा गाण्यावर आजपर्यंत खूप डान्स तुम्ही पाहिले असतील पण असा डान्स पाहिलाच नसेल.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकला त्याच्या घरात शर्ट-पॅन्टवर डान्स करत आहे. सुरूवातील तो लावणीचा ठेका धरत नृत्य सुरू करतो. तो मराठीती प्रसिद्ध गाणे चंद्रा या गाण्यावर डान्स करत असतो. यावर तो छान एक्सप्रेशनही देतो. हळूहळू चिमुकला गाण्यावर छान डान्स करायला सुरूवात करतो. हा व्हिडिओ त्याच्या घरातल्याच व्यक्तीने शूट केला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक नेटकरी फिदा झाले आहेत. अनेकांनी त्याच्या डान्स कौशल्याचे कौतुक केले आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >>नशीब म्हणजे काय? ते ‘हा’ VIDEO बघून कळेल; अवघ्या ५ सेंकदात मृत्यूच्या दारातून तरुण कसा परत आला पाहा
चिमुकल्याचा डान्स व्हिडिओ ”sanket____gomade” या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ कुठल्या शहरातील आहे हे आणि चिमुकल्याचे नाव काय हे समजू शकलेले नाही मात्र व्हिडिओ पाहून प्रत्येक जण या चिमुकल्याचं कौतुक करत आहे. एकानं म्हंटलंय, “एकच नंबर खूप छान” तर आणखी एकानं चिमुकल्याच्या एक्सप्रेशनचं कौतुक केलंय.