प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षक महत्वाची भूमिका बजावतात. शिक्षकांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी गुरुपोर्णिमा, शिक्षक दिनसारखे दिवस साजरे केले जातात. शिक्षक हे एकप्रकारे आपले पालकच असतात. शाळा असो किंवा कॉलेज आपले व्यक्तीमत्व घडवण्यात त्यांचा मोलाचा वाट असतो. अनेकदा शिक्षकांचे योग्य प्रकारे आभार मानता येत नाहीत. मात्र एका मुलाने अगदी आगळ्या वेगळ्याप्रकारे आपल्या शिक्षिकेचे आभार मानल्याचे व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.

आपल्या आवडत्या शिक्षिकेचा शाळेतील शेवटचा दिवस असल्याने या मुलाने त्यांना एक भन्नाट सप्राइज देण्याचे ठरवले. या मुलाने शिक्षिकेसाठी एक खास डान्स बसवला होता. हा व्हिडीओ नक्की कोणत्या कॉलेजमधला आहे याबद्दल खात्रीशीर माहिती समोर आलेली नाही. मात्र १२ वीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षिकेला दिलेला हा निरोप सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हा विद्यार्थी शाहरुख खानच्या ‘रब ने बना दी जोडी’ या सिनेमातील ‘तुझ मे रब दिखता हैं’ या गाण्यावर डान्स केला. या डान्समध्ये त्याने आपल्या शिक्षिकेलाही सहभागी करुन घेतले. गाण्यातील शब्दांनुसार या मुलाने दिलेले एक्सप्रेशन नेटकऱ्यांना खूपच आवडले आहेत. नाचता नाचताच हा विद्यार्थी शिक्षकांच्या पाया पडतानाही दिसतो. या व्हिडीओमधील बहुतेक सर्वच महिला शिक्षक आहेत. त्यामुळे या मुलाने निवडलेले गाणेही निरोप समारंभाच्या प्रसंगाला अगदी चपखल बसले आहे. महिला दिनाच्या एक दिवसआधीच सोशल नेटवर्किंगवर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये शिक्षिका स्वत:हून या मुलाबरोबर डान्स करायला येताना दिसतात.

या ट्विटवरील काही कमेन्टस..

तर शिकणे आणि शिकवणे सोप्पे होते

असे अनेक सुंदर क्षण जगाला पहायला मिळो

बोहोत हार्ड

बॉण्डींगचा नवा फॉर्म्युला

सुंदर

स्ट्रेस बस्टर

व्हिडीओमधील टाळ्या आणि शिट्ट्यांवरुन अनेकांना हा व्हिडीओ भरपूर आवडल्याचे दिसत आहे.

Story img Loader