Jugaad Cycle Viral Video : तुमच्यापैकी अनेकांनी लहानपणी शाळेत जाण्यासाठी सायकलचा वापर केला असेल, आजही अनेक जण सायकल वापरतात. पण, सायकल इतकी वर्षे जुनी असूनही तिच्या मूळ स्ट्रक्चरमध्ये कोणताही बदल झालेला दिसत नाही. पण, एका शालेय विद्यार्थ्याने जुगाड करून सायकलच्या हॅंडलच्या जागी चक्क कारचे स्टेरिंग बसवले आहे, ज्यामुळे तो रोज आता सायकल घेऊन अगदी स्वॅगमध्ये शाळेत जातो. त्याच्या या जुगाडचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून अनेकांना प्रश्न पडला आहे की, हे कसं शक्य आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पण, विद्यार्थ्याच्या या अप्रतिम जुगाडची आता अनेकांनी खूप प्रशंसा केली आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगा सायकल चालवत आहे, पण पुढच्याच क्षणी तुमचे लक्ष सायकलच्या हँडलकडे जाईल. कारण हे हँडल साधंसुधं नाही तर चक्क कारचं स्टेरिंग आहे. हे पाहून तुम्ही विचार करू लागला असाल की, त्याने हे कसं काय केलं असेल. पण, तो विद्यार्थी अगदी आनंदाने त्याची स्टीयर केलेली सायकल चालवत आहे आणि हसत आहे. त्याच्याकडे पाहून असे वाटते की, त्याला हँडलऐवजी कार स्टेअरिंगचा वापर करून सायकल चालवण्यात अधिक मजा येत आहे.

VIDEO : कायदे में चलो! पार्किंग चार्जच्या नावाखाली चक्क IPS अधिकाऱ्याची फसवणूक; अटेंडन्ट्सची तुरुंगात रवानगी

हा व्हिडीओ @arvindkashyap7364 या इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर करण्यात आला आहे, ज्यावर अनेकांनी हा भारी जुगाड असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी त्या विद्यार्थ्याला सायकल सावधगिरीने चालवण्याचा सल्ला दिला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Boy desi jugaad of placing car steering as cycles handle video goes viral on social media sjr
Show comments