सोशल मीडियावर अनेक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी अपघाताचा तर कधी स्टंटबाजीचा व्हिडीओ समोर येत असतात. सध्या असाच एक मुंबई लोकल ट्रेनमधील थराराक व्हिडिओ समोर आला आहे. गुरुवारी मध्यरात्री चर्चगेटला जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये एका तरुणाने अचानक ट्रेनच्या दरवाजातून खाली उतरून स्टंटबाजी सुरू केली. जीवघेण्या स्टंटबाजीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

धावत्या लोकलमध्ये तरुणाची जीव घेणी स्टंटबाजी

व्हिडीओमध्ये तरुण धावत्या रेल्वेच्या दरवाज्यांमध्ये उभा आहे आणि अचानक तो बोगीच्या पायऱ्यांवर लटकतांना दिसत आहे. त्याने खांबाला आत धरले आहे. तरुण अत्यंत निष्काळजीपणे हा स्टंट करताना दिसत आहे. त्याला स्वत:च्या जीवाची काहीही पर्वा नाही.चूकनही त्याचा आत खांबवरून सुटला असता तर तो ट्रेनमधून पडला असता. तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने त्याचा व्हिडिओ बनवला. हा प्रकार गुरुवारी रात्री १२.०५ वाजता घडला.

Chinese tourist fell down from train
‘सेल्फी’साठी तरुणी ट्रेन बाहेर डोकावताच झाडाला आदळली अन्…; पुढे जे झालं ते चमत्कारापेक्षा कमी नाही, पाहा अपघाताचा थरारक VIDEO
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Female Chinese Tourist Miraculously Survives After Falling From Running Train In Colombo Chilling Videos
धावत्या रेल्वेच्या दरवाज्यात उभी होती तरुणी, अचानक पाय सटकला अन्…. थरारक घटनेचा Video Viral
demand for ransom of Rs 2 crore case filed against three including Valmik Karad in kej
दोन कोटींच्या खंडणीची मागणी; वाल्मीक कराडांसह तिघांवर केजमध्ये गुन्हा
Six people arrested for smuggling gold worth Rs 10 crore Mumbai news
दहा कोटींच्या सोन्याच्या तस्करीत सहा जणांना अटक; तीन आरोपी विमानतळावरील कर्मचारी
Action taken against 20 dumpers for illegally dumping debris navi Mumbai news
नवी मुंबई: राडारोडा टाकणाऱ्या २० डंपरवर कारवाई
mobile transport officer stolen Mumbai, mobile stolen Mumbai,
मुंबई : वाहनावरील कारवाई टाळण्यासाठी परिवहन अधिकाऱ्याचा मोबाइलच पळवला
confusion among passengers after badlapur local departing from thane replaced with csmt local train
ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांचा गोंधळ; अचानक मुंबई दिशेकडे जाणारी लोकल लावल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम

हेही वाचा – ”पाव्हणं जेवला काय?” गाण्यावर थिरकल्या चिमुकल्या; दोघींचा डान्स पाहून तुम्ही गौतमी पाटीललादेखील विसरून जाल

स्टंटबाजी करणाऱ्या स्टंट

मुंबई लोकलमध्ये स्टंट करणाऱ्या तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. जीवघेणा स्टंट करणाऱ्या तरुणाला पाहून ट्रेनमध्ये उपस्थित इतर प्रवासी चांगलेच घाबरले होते. रेल्वे पोलिसांनी या तरुणाची ओळख पटवून त्याच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

असाच एक व्हिडिओ चार दिवसांपूर्वी समोर आला होता. एक मुलगा एका हायस्पीड ट्रेनच्या दरवाजाच्या चौकटीला धरून स्टंट करत होता. ट्रेन प्लॅटफॉर्मवर येण्यापूर्वीच या मुलाने ट्रेनमधून उडीही मारली होती. आता पुन्हा एकदा स्टंटबाजीचा व्हिडिओ समोर आला आहे.

Story img Loader