Viral Video: प्रत्येजकण जेव्हा पैशांची बचत करण्यास सुरु करतो तेव्हा त्यामागे काही हेतू, काही स्वप्न असतात. घर, स्वत:चं वाहन, जमीन आणि बरंच काही असतं या स्वप्नांच्या यादीमध्ये असते. यातील बरेच स्वप्ने स्वप्न आपल्या आई-बाबांची देखील असतात. स्वतःची हक्काची कार असावी असे प्रत्येक तरुण मंडळींचे स्वप्न असते. जेव्हा हे स्वप्न पूर्ण होते तेव्हा आपल्याला तर आनंद होतोच. पण, आई-बाबांच्या डोळ्यातील आपला अभिमान पाहून तो आनंद आणखीनच द्विगुणित होतो. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. बाबांच्या निधनानंतर आठ वर्षांनी एका लेकाने त्यांचे गाडी घेण्याचे स्वप्न पूर्ण केलं आहे आणि आईला सरप्राईज दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तरुणाच्या वडिलांचे कार घेण्याचे जाण्याचे स्वप्न होते. पण हे स्वप्न पूर्ण होण्याआधीच त्यांचे निधन झाले. त्यावेळी तरुणाच्या आईने त्यांचे कुटुंब खूप चांगल्याप्रकारे जोडून ठेवले. सर्व समस्यांशी तरुणाची आई धैर्याने लढली. त्यावेळी तरुणाने बाबांचे कार घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे ठरवले आणि आज आठ वर्षांनी आईला सरप्राईज दिले. यावेळी आईचे भाव अगदीच हृदयस्पर्शी होते.बाबांचे स्वप्न एके दिवशी त्यांचा मुलगा स्वप्न पूर्ण करेल याची तिला कल्पनाही नव्हती. यामुळे आईच्या अश्रूंचा बांध फुटला. एकदा पाहाच हा हृदयस्पर्शी व्हिडीओ.

हेही वाचा…VIDEO: बोटचालक बनला प्रशिक्षक; फोटोसाठी सुचवल्या अशा पोझ की, तुम्ही क्वचितच पाहिलं असेल ‘असं’ भन्नाट फोटोशूट

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, तरुण आईला घेऊन गाडीच्या शोरूममध्ये जातो. गाडी खरेदी करण्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करतो. त्यानंतर आईला नव्या-कोऱ्या गाडीपाशी घेऊन जातो. आई गाडीवरील निळा कपडा काढते तर सगळे आनंद व्यक्त करतात. त्यानंतर आई गाडीत जाऊन बसते. गाडीत आपल्या जोडीदाराबरोबरचा फोटो पाहून आईच्या अश्रूंचा बांध फुटला व आपल्या नवऱ्याचे स्वप्न लेकाने पूर्ण केलं याचा आनंद तिच्या डोळ्यात दिसू लागला. कुटुंबातील सर्व सदस्य आईला रडताना पाहून भावुक झाले व शेवटी पूजा करून नव्या-कोऱ्या गाडीतून आपल्या घरी जायला निघतात.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @nileshkotadiya_ तरुणाच्या या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तरुणाने त्याच्या बाबांच्या मृत्यूनंतर कशाप्रकारे आईने संघर्ष केला आणि आठ वर्षानंतर बाबांचे गाडी घेण्याचे स्वप्न कसं पूर्ण केले याची गोष्ट सांगितली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून तरुणाला शुभेच्छा तर देत आहेत. तसेच विविध शब्दांत त्यांच्या भावनाही कमेंटमध्ये व्यक्त करताना दिसून आले आहेत. एकूणच सोशल मीडियावर या व्हिडीओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Boy fulfills his late father dream mother priceless reaction after her son surprises her with a car watch viral video ones asp
Show comments