राज्यातील दहावीचा निकार २७ मे ला जाहीर झाला. या वर्षीचा दहावीचा निकाल हा ९५.८१ टक्के लागला. ज्यामध्ये कोकण विभागातील सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर नागपुराचा निकाल सर्वात कमी लागला. यासगळ्या माहोलात दहावीच्या मुलांशी संबंधीत अनेक बातम्या समोर आल्या ज्यामध्ये एका विद्यार्थ्याला पैकीच्या पैकी मार्क म्हणजे शंभट टक्के मिळालं आहे. जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक आहेच. मात्र काही विद्यार्थी अगदी काठावर पास होऊनही आनंदी असतात. तर काही विद्यार्थी पैकीच्या पैकी गुण मिळवूनही नाराज असतात. त्यांना शंभर टक्के निकाल हवा असतो. दरम्यान सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय यामध्ये ४८ टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्याचे त्याच्या मित्रांनी बॅनर लावले आहेत. हा बॅनर पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.

तरुणाच्या मित्रांनी छापलेलं बॅनर पाहून तुम्हीही म्हणाल आयुष्यात काही नसलं तरी चालेलं पण एवढा कॉन्फिडन्स मात्र नक्की हवा. अभ्यासात थोडासा कच्चा असल्याने त्याला पास होण्याविषयी साशंकताच होती. मात्र काठावर का होईना पास झाल्याने त्याच्यासह त्याच्या कुटुंबीयांना देखील मोठा आनंद झाला आहे. त्याच्या मित्राने तर चक्क चौकात अभिनंदनाचे बॅनर लावले. या बॅनरवर तुम्ही पाहू शकता, ४८.८० टक्क्याने पास झालेल्या तरुणाचा फोटो आणि त्याचं अभिनंदन करणाऱ्या मित्रांचे फोटो लावले आहेत.

Kerala Ban On Digital Notes
Kerala Ban On Digital Notes : आता पालकांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर येणार नाही मुलांचा गृहपाठ, डिजिटल स्वरुपातील नोट्सवर बंदी; ‘या’ राज्याने घेतला निर्णय!
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा…
Due to indebtedness women try to commit suicide in Indrayani river Alandi
आळंदी: इंद्रायणी नदीत ‘ती’ मृत्यूची वाट पाहत बसली; पण नियतीला काही वेगळच…
Crime against three who tie down man in house even after repaying the loan
कर्जाची परतफेड केल्यानंतरही घरात डांबणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा
father of rape victim change birth record to save accused
Jaipur Crime News : बाप नव्हे हैवान! बलात्कारी आरोपीला वाचवण्यासाठी स्वतःच्या मुलीची बदलली जन्मतारीख
Hanumankind music video woman maut ka kuan
Big Dawgs: ‘मौत का कुआं’मध्ये स्टंट करणारी कल्याणची कांचन आणि पती सुलतान शेखची प्रेम कहाणी, रॅपर साँगच्या माध्यमातून ठरली जगभरात चर्चेचा विषय
Victim Aryan Mishra
Aryan Mishra Murder: आर्यन मिश्राला गोरक्षकांनी गोळ्या झाडून मारलं; वडील म्हणाले, “आम्ही पंडित आहोत…”
Bank employee stabbed to death in pune
धक्कादायक : किरकोळ वादातून बँक कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार करून खून, हडपसर भागातील घटना; तीन अल्पवयीनांसह चौघे ताब्यात

दरम्यान तुम्ही जर हे बॅनर नीट पाहीलं तर तुमच्या लक्षात येईल की, ४८ गुण छोट्या अक्षरात तर पॉईंट ८० हे मोठ्या अक्षरात छापले आहेत. त्यामुळे बघणाऱ्या पहिल्यांदा ८० टक्के गुण मिळाले आहेत असंत वाटतं.

पाहा व्हिडीओ

https://www.instagram.com/p/C7dvJUYxyUL/?utm_source=ig_web_copy_link

हेही वाचा >> समुद्रातील व्हेल माशाला खायला घालत होती तरुणी; पुढच्याच क्षणी घडलं असं की…VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

 दहावी हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातला महत्त्वपूर्ण क्षण असतो. या परीक्षेवरुन त्याचे भविष्य ठरत असते. गेल्या काही वर्षांध्ये दहावीच्या परीक्षेचे रुपांतरण एका स्पर्धेमध्ये झाले आहे. लाखो स्पर्धेक असलेल्या या स्पर्धेमध्ये आपण सरस ठरावे असे प्रत्येकाला वाटत असते. पालकांना देखील आपल्या मुलाला ९० किंवा त्यापेक्षा जास्त टक्के मिळावेत असे वाटत असते. आजकाल दहावीमध्ये तब्बल १०० टक्क्यांनी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दलच्या आपण ऐकत असतो.

दरम्यान, यंदाच्या निकालातही कोकण विभागाने वर्चस्व कायम ठेवलं आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक ९८.११ टक्के निकाल लागला आहे. राज्यात ६६ हजार विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. तर, १लाख ९,३४४ विद्यार्थ्यांना ८५ते ९०टक्के गुण मिळाले आहेत.