Viral video: सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात; ज्यामध्ये काही आपलं मनोरंजन करणारे असतात, तर काही आपल्याला भावूक करणारे. सध्या देशभरात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. मुंबईतील लालबाग, चिंचपोकळी हा भाग गणेशभक्तांसाठी पंढरी मानला जातो. दरवर्षी या ठिकाणी बाप्पााच्या आगमनासाठी लाखो भाविकांची गर्दी पाहायला मिळते. यावर्षीही लाखो लोक बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी लालबागला आले आहेत. दरम्यान याच लालबागच्या गर्दीतला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लालबागच्या एवढ्या गर्दीतही एका तरुणानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. हा तरुण एक पाटी घेऊन उभा होता. या पाटीवर असं काही लिहलं आहे की पाहून सगळ्या मुली थांबू लागल्या. फक्त थांबल्याच नाही तर लाजल्या सुद्धा. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून सोशल मीडियावर याच पाटीची चर्चा सुरु आहे.

पाटी पाहून सगळ्याच मुली लाजू लागल्या

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

पुणेरी पाट्या तर जगभरात प्रसिद्ध आहेतच, मात्र आता ही लालबागमधली पाटी वाचली तर तुम्हीही पोट धरुन हसाल. एक लालबागच्या एवढ्या गर्दीत रस्त्यावर उभा राहून एक पाटी झळकवत आहे. या पाटीवर तरुणानं असं काही लिहलं आहे की पाहून तम्हीही हसाल. खास करुन मुलींसाठी त्यानं या पाटीवर हा आश लिहला आहे.

असं लिहलंय तरी काय?

आता तुम्ही म्हणाल या पाटीवर असं लिहलंय तरी काय? तर या पाटीवर “फक्त गर्दीत हात धरणारी नको सोबत हरतालिकेचा उपवास धरणारी हवी” असा आशय लिहला आहे. महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये हरतालिकेचे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळावा यासाठी करतात. नुकतीच हरतालिका झाली, याच पार्श्वभूमीवर तरुणानं मनोरंजनासाठी ही पाटी झळकली.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “जेवढी गरज…” आतापर्यंतची सगळ्यात भारी पाटी! वाचून तुम्हीही कराल कौतुक; PHOTO एकदा पाहाच

सोशल मीडियावर हा व्हिडीओ charkopmemes नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, प्रचंड व्हायरल होत आहे. युजरने व्हिडीओ शेअर करताना “तू फक्त हो म्हण दोघे एकत्र हरतालिकेचा उपवास धरू” असं कॅप्शन लिहलं आहे. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट केलीय, “कधी भेटेल सोबत उपवास करणारी बाप्पाालाच माहिती” तर आणखी एकानं कमेंट केलीय, “तिलाच मागायला आलोय बाप्पाकडे” अशी कमेंट केली आहे.

Story img Loader