Viral video: सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात; ज्यामध्ये काही आपलं मनोरंजन करणारे असतात, तर काही आपल्याला भावूक करणारे. सध्या देशभरात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. मुंबईतील लालबाग, चिंचपोकळी हा भाग गणेशभक्तांसाठी पंढरी मानला जातो. दरवर्षी या ठिकाणी बाप्पााच्या आगमनासाठी लाखो भाविकांची गर्दी पाहायला मिळते. यावर्षीही लाखो लोक बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी लालबागला आले आहेत. दरम्यान याच लालबागच्या गर्दीतला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लालबागच्या एवढ्या गर्दीतही एका तरुणानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. हा तरुण एक पाटी घेऊन उभा होता. या पाटीवर असं काही लिहलं आहे की पाहून सगळ्या मुली थांबू लागल्या. फक्त थांबल्याच नाही तर लाजल्या सुद्धा. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून सोशल मीडियावर याच पाटीची चर्चा सुरु आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा