Viral video: सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात; ज्यामध्ये काही आपलं मनोरंजन करणारे असतात, तर काही आपल्याला भावूक करणारे. आपल्याला माहीत आहे की, आई-वडील आपल्या मुलांना मोठं करताना अपार कष्ट आणि मुलांना चांगलं शिक्षण देतात. हेच कष्ट डोळ्यासमोर ठेवून मुलं आई-वडिलांचं नाव मोठं करतात. आई जन्म देते, सांभाळ करते, प्रेम देते, सांभाळून घेते म्हणून ती जवळची होते. पण, खऱ्या अर्थानं जगणं शिकविणारा असतो तो बाप. आयुष्याच्या प्रत्येक मोठ्या वळणावर आपल्या मुलांचं भलं व्हावं यासाठी खचता खाणारा असतो तो बाप. मुलांच्या मागे खंबीरपणे उभा राहणारा असतो तो बाप. कितीही केलं तरी बापाचं प्रेम हे दुर्लक्षितच राहतं. त्याच्या असण्यानं घराला घरपण लाभतं. आपल्या कडक शब्दांनी मुलांना ओरडणारा बाप त्यांच्यासाठीच दिवसभर खस्ता खात असतो. त्याची माया उमगणं कठीणच.
लहान मुलेही थांबून विचार करायला लागली
दरम्यान, हाच बाप म्हणजे काय हे एका तरुणानं शाळकरी मुलांना सांगण्याचा एक आगळा वेगळा प्रयत्न केला आहे. हा तरुण एका शाळेसमोर हातात पाटी धरून उभा आहे. तरुणानं या पाटीवर असं काही लिहिलंय की, लहान मुलंही थांबून विचार करायला लागली. या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
असं काय लिहलंय या पाटीवर ?
या पाटीवर असं काय लिहिलंय की, चिमुकल्यांचीही पावलं तिथे थांबली, असं तुम्हाला वाटत असेल. तर या पाटीवर वडिलांच्या कष्टाची जाणीव मुलांना करून देण्याचा प्रयत्न या तरुणानं केला आहे. या पाटीवर “मन लावून अभ्यास करा मित्रांनो; कारण तुमच्या शाळेची फी भरण्यासाठी तुमचे वडील आठ तासांऐवजी १६ तास काम करत असतात,” असा मजकूर लिहिला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शाळा सुटल्यावर बाहेर येणारे विद्यार्थी ही पाटी पाहून थांबत आहेत. काही पालकही ही पाटी वाचून थांबत आहेत आणि ही पाटी वाचून काही जण भावूकही झाले आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: अखेरचा हा तुला दंडवत…दीड फुटाचा डेस्क अन् त्यावर गाळलेला घाम; सहाय्यक कृषी अधिकाऱ्याची पोस्ट व्हायरल
हा व्हिडीओ posterboymonti या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट केलीय, “एकदम बरोबर.” दुसऱ्यानं कमेंट केली, “बापाचं प्रेम हे असंच असतं.”