Viral photo: सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात; ज्यामध्ये काही आपलं मनोरंजन करणारे असतात, तर काही आपल्याला भावूक करणारे. आपल्याला माहीत आहे की, आई-वडील आपल्या मुलांना मोठं करताना अपार कष्ट आणि मुलांना चांगलं शिक्षण देतात. पोटच्या मुलांसाठी आई-वडील वाट्टेल त्या गोष्टी करायला तयार असतात. आपल्या मुलांना साधं खरचटलं तरी आईच्या डोळ्यांत टचकन पाणी येतं. लहानाचं मोठं केलेल्या या मुलांनी आई-वडिलांच्या म्हातारपणी त्यांना व्यवस्थित सांभाळावं, अशी अपेक्षा असते. मात्र आजूबाजूला अशी अनेक प्रकरणं आपण पाहतो ज्यामध्ये म्हातारपणी आई-वडिल हे वृद्धाश्रमात असतात. पोटची मुंल आई-वडिलांना व्यवस्थित वागणूक देत नाहीत. याच पार्श्वभूमीवर एका तरुणानं झळकवलेली पाटी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय. ही पाटी प्रत्येकालाच विचार करायला भाग पाडत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, आई-वडिलांसाठी आपण काय केलं पाहिजे हे एका तरुणानं शाळकरी मुलांना सांगण्याचा एक आगळा वेगळा प्रयत्न केला आहे. म्हातारपण हे दुसरे बालपण असते, असे म्हणतात. यावेळी मुलांनी आई-वडिलांना समजून घेणे अपेक्षित असतं. मात्र काहीजण आई-वडिलांना समजून न घेता त्यांना चूकीची वागणूक देतात. यावेळी लहानपणी आपल्यासाठी आपल्या आई-वडिलांनी काय केलंय हे मात्र ते विसरतात. तरुणानं अशा लोकांना याचीच जाणीव करुन दिली आहे. आता तुम्ही म्हणाल पाटीवर असं लिहलंय तरी काय ? तर या पाटीवर “जेवढी गरज लहानपणी मुलांना आई-वडिलांची असते तेवढीच गरज म्हातारपणी आई-वडिलांना मुलांची असते.” ही पाटी वाचून काही जण भावूकही झाले आहेत.

पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. पुणेरी किस्से आणि पुणेरी पाट्या जगजाहीर आहेत. याच पाट्या आता शहराबाहेरही पाहायला मिळतात. या पाट्यांमधून खरोखरच एक सामाजिक संदेश मिळतो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> बाई हा काय प्रकार! काकूंनी केला असा योगा की VIDEO पाहून पोट धरुन हसाल; लहान लेकरं तर पळून जातील

सोशल मीडियावर हा फोटो thebaviskar03 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट केलीय, “एकदम बरोबर.” दुसऱ्यानं कमेंट केली, “आई-बापाचं प्रेम हे असंच असतं फक्त त्यांना समजून घ्या.” तर आणखी एकानं कमेंट केलीय, “एकदम बरोबर बोल्लास भावा..आतापर्यंतची सर्वात भारी पाटी ”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Boy hold poster of parents love in front of road photo goes viral on social media by watching people can agree with this srk