Viral video: एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेली अनेक जोडपी तुम्ही पाहिली असतील. अशी अनेक जोडपी असतात ज्यांना घरातून नात्यासाठी परवानगी नसते. अशावेळी जगाची पर्वा न करता ही जोडपी गुपचूप एकमेकांना भेटतात. मांजर दुध पिताना डोळे बंद करून पिते म्हणून तिला वाटते की मला कोणीही पाहत नाही” मात्र तिला सगळे पाहत असतात. असंच काहीसं या प्रेमात पडलेल्या तरुणाईचं असतं. घरच्यांचा डोळा चुकवून ते एकमेकांना भेटतात खरे पण कधीतरी ते सापडतातच. असाच एक प्रकार सध्या समोर आला आहे. एक तरुण गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी टेरेसवर पोहोचतो मात्र समोर गर्लफ्रेंडचे बाबा येतात. आता तुम्हीच विचार करा या तरुणाचं काय झालं असेल. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नेमकं काय झालं?

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”

तर त्याचं झालं असं की, एक तरुण आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी तिच्या घरच्या टेरेसवर पोहचला होता. यावेळी अचानक तिथे तरुणीचे काका आणि बाबा आल्याचं व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. त्यामुळे गर्लफ्रेंडला भेटायला आलेल्या बॉयफ्रेंडची चांगलीच फजिती झाली. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा तरुण टेरेसवरुन अक्षरश: उड्या मारून खाली उतरत आहे. यावेळी त्याचा जरा जरी तोल गेला असता तर मोठा अपघात झाला असता. तसेच यामध्ये तरुण जखमी होण्याचीही शक्यता आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही डोकं धरालं.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> ‘प्रिय बॉस, मी भविष्यातला करोडपती’ म्हणत तरुणानं दिला राजीनामा; लेटर झालं व्हायरल, कारण वाचून व्हाल लोटपोट

यासगळ्यात कसाबसा बॉयफ्रेंड पळ काढतो. पण नंतर तरुणी मात्र एकटीच या सगळ्यात अडकते.हा व्हिडीओ @stunt_man_indori_ नावाच्या ट्वीटर हँडलवरुन सोशल मीडियावर अपलोड केला गेला आहे. त्यानंतर या व्हिडीओने एकच गोंधळ उडवून दिला आहे. या व्हिडीओला लाखोवेळा पाहिलं गेलं आहे, तर अनेकांनी यावर भरभरुन कमेंट्स केल्या आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक तरुणाची मस्करी करत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, “काय गरज होती” असंच केलं पाहिजे.’

काही महिन्यांपूर्वीही अशीच घटना समोर आली होती. यामध्ये, राजस्थानमध्ये एका तरुणीनं घरात कुणी नसल्याचा फायदा घेत बॉयफ्रेंडला घरी बोलावलं मात्र तिचा असा पचका झाला की तिला बॉयफ्रेंडला चक्क कुलरमध्ये लपवावं लागलं. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Story img Loader