Viral video: सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. अनेकदा असे व्हिडीओ पाहायला मिळतात जे आवाक् करून सोडतात. सध्या राज्यभरात पोलिस भरतीचं सत्र सुरू आहे. मुंबईतही पोलिस भरतीच्या परीक्षा, मैदानी चाचणी सुरू आहेत. यावेळी संपूर्ण राज्यभरातून तरुण, तरुणी या भरतीसाठी येत असतात. मात्र सगळेच भरती होतात असं नाही. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याने सध्या तरुणांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.बेरोजगार झालेल्यांमध्ये प्रामुख्याने पदवीधारकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अर्थव्यवस्था म्हणाव्या तितक्या वेगाने आणि सर्वसमावेशक वाढली नाही, हे बेरोजगारीचे सर्वांत मोठे कारण ठरले आहे.

कमी शिकलेले तरुण लहान मोठे काम करणे सुरू करतात. मात्र पदवीधर तरुण आपल्या शिक्षणायोग्य नोकरी पाहतात. मात्र नवीन नोकऱ्याच निर्माण होत नसल्याने तरुण बेरोजगार होत आहेत. खूप महिन्यांपासून नोकरी शोधूनही ती मिळत नसल्याने अनेकांनी नाराज होत आता नोकरी शोधणेच थांबविले आहे. दरम्यान असाच एक तरुण पोलीस भरतीमध्ये अवघ्या ३ मार्कांनी नापास झाला अन् त्यानंतर त्यानं त्याचं एवढं टेन्शन घेतलं की अक्षरश: त्याला वेड लागलं. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

पोलीस होण्यासाठी प्रचंड मेहनत आणि अभ्यास करण्याची गरज असते. यामध्ये एका मार्कानेही खूप फरक पडतो कारण स्पर्धक मोठ्या प्रमाणात असतात. असाच एक तरुण पोलीस भरतीत ३ मार्कानं नापास झाला आणि बाहेर आला त्यामुळे नैराशात गेला आणि आता त्याला अतिविचार आणि टेन्शनने वेड लागले आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा तरुण एका दुकानाबाहेर डोकं धरु बसला असून एकटाच बोलत आहे.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या तरुणावर टीका केली आहे. एकाने म्हटलेय, “आयुष्य एवढं सहज मिळतं का?” तर आणखी एकाने, “भावा, नोकरी दुसरी मिळेल; पण हे आयुष्य पुन्हा नाही” तर आणखी एकानं “मित्रहो स्पर्धा परीक्षेची तयारी करताना मनमोकळं, बिनधास्त पणे, हसत खेळत जगता आलं पाहिजेत.. लोकांचं बोलणं,नातेवाईकांचे बोलणं हे काय म्हणतील ते काय म्हणतील त्या लोकांच्या विचार करायचा नाही…. शेवटी आई वडील कुटुंबासाठी जगा… आयुष्यात शासकीय पदच सर्व काही नसते…” अशी प्रतिक्रिया दिली आहे, यावर एकानं रिप्लाय दिला आहे की, हे बोलणं खूप सोप आहे भावा पण ज्यांनी खरंच जिद्दीने आणि मनापासून प्रयत्न केला आहे त्यांनाच त्या वर्दीची किंमत समजू शकते. आणि सध्या नोकरी म्हणजे सर्व काही अशी परिस्थिती झाली आहे फक्त मुलींमुळे मुलींच्या आई-वडीमुळे त्यांच्या अपेक्षेमुळे. सगळं समाजाच्या मुलांकडून असलेल्या अपेक्षा मुळे असं होत आहे. या व्हिडीओवर येत आहेत.