Shocking video: सोशल मीडिया हे असं प्लॅटफॉर्म आहे, जेथे आपल्या नवनवीन व्हिडीओ पाहायला मिळतात. जे आपलं मनोरंजन करतात. येथे आपल्याला कॉमेडी, इंफोर्मेटीव्ह आणि बरेच क्राफ्ट व्हिडीओ देखील पाहायला मिळतात. आपण सिनेमांमध्ये अनेक वेळा उंच इमारतीवरून हिरोला स्टंट करताना पाहिलं असेल. मात्र खऱ्या आयुष्यातही काही तरुण असे अनेक स्टंट करतात, जे पाहून आपल्या अंगावर काटा उभा करतात. तर बरेच लोक असे देखील असतात, जे स्टंट करायला जातात खरं, परंतु त्यांच्यासोबत असं काहीसं घडतं, ज्याचा आपण विचार देखील करु शकत नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही घाम फुटला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जीवघेणी स्टंटबाजी

या व्हिडीओमध्ये तु्म्ही पाहू शकता, एक तरुण उंच इमारतीवरुन स्टंटबाजी करताना दिसत आहेत. यामध्ये तरुण एका इमारतीवरुन जीवघेणा स्टंट करत आहे. या व्हिडीओमध्ये तरुण इमारतीवरून खाली उडी मारताना दिसत आहे. तो तरुण पाठीमागे उलटी खाली उडी मारतो. यावेळी इतक्या उंचावरुन कोणत्याही सुरक्षेशिवाय या तरुणाने उडी मारली आहे. मात्र, तरुणाची थोडीशीही चूक त्याच्या जिवावर बेतू शकते.

तरुणानं उडी मारल्यानंतर तो खाली असलेल्या वाळूवर पडतो, यावेळी त्याच्या पाठीला लागलं असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. मात्र काहीच झालं नसल्याची प्रतिक्रिया हा तरुण देत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक जोरदार कमेंट करत आहेत. या तरुणाने ज्या पद्धतीने बॅक फ्लिप जंप केला आहे, ते पाहता त्याने खूप सराव केला असेल असे वाटते, पण या स्टंट दरम्यान झालेली एक चूकही या तरुणाचा जीव घेऊ शकते. प्रसिद्ध होण्यासाठी लोक काहीही करत असतात. विशेषत: तरुणांमध्ये प्रसिद्ध होण्याची स्पर्धा लागली आहे. त्यासाठी ते काहीही करायला तयार असतात.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: “माणसात माणुसकी अनंत राहू दे” पुरात अडकलेल्या मांजरांची तरुणांना आली दया; पुढे काय घडलं पाहाच

@HayulAnsari नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे. कोणत्याही सुरक्षेशिवाय तरुण अशा प्रकारे उडी मारताना पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून आतापर्यंत या व्हिडीओला ६,९७५ व्ह्यूज मिळाले आहेत. यावर नेटकरी प्रतिक्रिया देताना टीका करत आहेत, एकानं प्रतिक्रिया देताना तरुणावर कारवाईची मागणी केली आहे तर आणखी एकाने “आयुष्य एवढं सहज मिळतं का ?” असा सवाल केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Boy performing a stunt by jumping on building boy risked his life to make a reel shocking video goes viral srk