सोशल मीडिया हे असं प्लॅटफॉर्म आहे, जेथे आपल्या नवनवीन व्हिडीओ पाहायला मिळतात. जे आपलं मनोरंजन करतात. येथे आपल्याला कॉमेडी, इंफोर्मेटीव्ह आणि बरेच क्राफ्ट व्हिडीओ देखील पाहायला मिळतात. आपण सिनेमांमध्ये अनेक वेळा उंच इमारतीवरून हिरोला स्टंट करताना पाहिलं असेल. मात्र खऱ्या आयुष्यातही काही तरुण असे अनेक स्टंट करतात, जे पाहून आपल्या अंगावर काटा येतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही घाम फुटला आहे.
हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून तुम्हालाही कळेल महिलांच्या तुलनेत पुरुषांना आयुष्य कमी असं का म्हणतात. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती इमारतीच्या छतावर रेलिंगवर बसलेला आहे, रेलिंगपासून सुमारे १० फूट अंतरावर एक लोखंडी खांब असल्याचे दिसत आहे. याच खांबावर उडी मारुन स्टंटबाजी करताना हा तरुण दिसतोय. यामध्ये तो स्वत:च्या जीवाची बाजी लावत हा धोकादायक स्टंट करतोय. एवढा मोठा गॅप असूनही हा तरुण उडी मारून खांबावर येतो आणि घसरत खाली पोहोचतो.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – दिल्ली मेट्रोत कपलची जोरदार भांडणं, गर्लफ्रेंडने सर्वांसमोर धु- धु धुतला..अन् Video झाला व्हायरल
कोणत्याही सुरक्षेशिवाय तरुण अशा प्रकारे उडी मारताना पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून आतापर्यंत या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. तर नेटकरीही यावर प्रतिक्रिया देत आहेत, एका युजरने यावर म्हंटलंय की, म्हणूनच महिलांच्या तुलनेत पुरुषांना आयुष्य कमी असतं.