सोशल मीडिया हे असं प्लॅटफॉर्म आहे, जेथे आपल्या नवनवीन व्हिडीओ पाहायला मिळतात. जे आपलं मनोरंजन करतात. येथे आपल्याला कॉमेडी, इंफोर्मेटीव्ह आणि बरेच क्राफ्ट व्हिडीओ देखील पाहायला मिळतात. आपण सिनेमांमध्ये अनेक वेळा उंच इमारतीवरून हिरोला स्टंट करताना पाहिलं असेल. मात्र खऱ्या आयुष्यातही काही तरुण असे अनेक स्टंट करतात, जे पाहून आपल्या अंगावर काटा उभा करतात. तर बरेच लोक असे देखील असतात, जे स्टंट करायला जातात खरं, परंतु त्यांच्यासोबत असं काहीसं घडतं, ज्याचा आपण विचार देखील करु शकत नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही घाम फुटला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हिडीओमध्ये तु्म्ही पाहू शकता, काही तरुण उंच इमारतीवरुन स्टंटबाजी करताना दिसत आहेत. यामध्ये तरुण एका इमारतीवरुन दुसऱ्या इमारतीवर जीवाची पर्वा न करता उड्या मारत आहेत. इतक्या उंच इमारतीवरून कोणत्याही सुरक्षेशिवाय हा तरुण स्टंटबाजी करत आहे. एका इमारतीवरुन जोरात धावत येऊन हा दुसऱ्या इमारतीवर उडी मारतो. या दोन इमारतीमध्ये अंतरही मोठं आहे. त्यामुळे तरुणाची थोडीशी चूक त्याच्या जिवावर बेतू शकते. पुढच्याच क्षणी तो छताच्या रेलिंगवर धावून उडी मारायला लागतो. पण नंतर असं काही घडतं, ज्याची कल्पना स्टंट करणाऱ्या व्यक्तीनेही केली नसेल. सुदैवाने पाय घसरताच तरुणाने तारेला पकडलं, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – टायरचे पंक्चर काढताना अचानक ट्युब फुटली, तीन कामगार जागेवरच…VIDEO पाहून बसेल धक्का

आपण सिनेमांमध्ये अनेक वेळा उंच इमारतीवरून हिरोला स्टंट करताना पाहिलं असेल. अनेक व्हिडीओही तुम्ही पाहिले असतील. मात्र प्रत्यक्षात हे जीवघेणं ठरु शकतं. साहसी स्टंट करण्याच्या नादात अनेकदा दुखापतही होते तर कधी हे स्टंट जीवाशी येतात.