सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओं चर्चेत येतात. यातील काही व्हिडीओ प्राणी आणि पक्ष्यांचे असतात. काही काही व्हिडीओ मजेदार असल्यामुळे आपण चकित होऊन जातो. तर काही व्हिडीओंना पाहिल्यामुळे आपण प्रचंड घाबरतो. सध्या तर एक विचित्र व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एका मुलगा चक्क सापासोबत खेळत आहे. मात्र, हा खेळ त्याला चांगलाच महागात पडला आहे. सापाने या मुलाला असा धडा शिकवला की तो आयुष्यभर कधी विसरू शकणार नाही. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही तरुण अति उत्साह किंवा रातोरात प्रसिद्ध होण्यासाठी जीवघेणा स्टंट करत असतात. एका तरुणानं आता एक जीवघेणा आणि क्रूर स्टंट केला आहे. या तरुणानं क्रूरतेचा कळस गाठला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकू शकतो. हा व्हिडीओ एका तरूणाचा आहे. तो सापासोबत जीवघेणा खेळ खेळत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, कशी पद्धतीने या मुलाने सापाला आपल्या एका हातात पडकलंय. हा मुलगा वारंवार या सापाकडे तोडांने फुंकर मारताना दिसून येतोय. किती वेळा तर हा मुलगा सापाला त्याच्या तोंडाच्या जवळ घेताना दिसून येतोय. हे दृश्य पाहून थोड्या वेळासाठी असं वाटू लागतं की आता साप या मुलाला चावणार. पण तो साप या मुलाकडे फक्त पाहत राहतो.

आणखी वाचा : जेव्हा वाघाच्या बछड्याने आईला मिठी मारली…, हा VIRAL VIDEO जिंकतोय लाखो लोकांची मनं

पण यानंतर जे फ्रेममध्ये दिसून येतं, हे पाहून मोठा धक्काच बसतो. शेवटी ज्याची भीती होती, तेच पुढे घडलं. बराच वेळ हा मुलगा मोठ्या जोशमध्ये या सापासोबत खेळत होता, पण सापाने खूप वेळ या मुलाचं खेळणं पाहिलं आणि एकदाच धडा शिकवला. यात मुलाची जी अवस्था झाली ते पाहून तुमच्या अंगावर शहारे नक्कीच येतील.

आणखी वाचा : खाकी वर्दीचा धाक दाखवून आधी पॅंट साफ करायला लावली, मग कानशिलात मारली…लेडी कॉन्स्टेबलचा हा VIDEO VIRAL

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : खाकी वर्दीतला ‘बाप’माणूस! लेकीकडून मेकअप करवून घेताना IPS पित्याचा VIDEO VIRAL

हा व्हिडीओ ‘@Folico’ नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही मिनिटांसाठी तुम्ही सुन्न व्हाल. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही लक्षात आलं असेल की, साप ही काही खेळण्याची गोष्ट नाही किंवा मजा-मस्ती करण्याचा विषय नाही. कारण व्हिडीओमध्ये जे पहायलं मिळतंय ते खरोखर थक्क करणारं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत.

आणखी वाचा : हॉटेलमध्ये तंदुरी रोटी खाण्यापूर्वी हा VIRAL VIDEO एकदा पाहा, कॅमेऱ्यात कैद झालं हे किळसवाणं कृत्य

हा व्हिडीओ पाहून लोक यावर आपले वेगवेगळे कमेंट्स शेअर करताना दिसून येत आहेत. काही युजर्सनी तर सापासोबत खेळणाऱ्या मुलावर जोरदार टिका करण्यास सुरूवात केली आहे. तर काही युजर्सनी असे स्टंट तुमच्या जीवावर बेतू शकतात, त्यामुळे कुणीही असे स्टंट न करण्याचं आवाहन देखील करताना दिसून येत आहेत. काहींनी या मुलाला चांगलाच धडा मिळाला असल्याचं सांगितलं आहे.