प्रेम आंधळं असतं असं म्हणतात, होय ते खरंच आहे. कारण प्रेमासाठी प्रेमीयुगुल काय करतील याचा अंदाज बांधणं कठीण आहे. 1912 मध्ये अथांग महासागरात बुडालेल्या टायटॅनिक जहाजावर आधारित सिनेमा पाहिला की, खऱ्या प्रेमात काय ताकद असते याचा प्रत्यय आपल्याला पाहायला मिळतो. कारण एका प्रियकराने टायटॅनिक स्टाईलमध्येच त्याच्या प्रेयसीला प्रपोज करण्याचं ठरवलं. महासागराच्या मध्यभागी बोटीवर असताना दोघांनीही टायटॅनिक पोज तर दिलीच पण प्रेयसीला अंगठी देण्याची वेळ आली अन् घडलं भलतंच…
फ्लोरीडा मध्ये राहणारा एक तरुण त्याच्या प्रेयसीला प्रपोज करण्याच्या तयारीत असतो. त्याचदरम्यात हातात असलेली अगंठी खोल महासागरात पडते आणि त्याच्या सर्व मेहनतीवर पाणी फेरतं. नेकमं काय घडलं असावं? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर तर मिळेलंच पण आश्चर्याचा धक्काही बसेल.
नेमकं काय घडलं?
स्कॉट आणि त्याची प्रेयसी सुझी एका बोटीवर महासागराच्या मधोमध प्रवास करत असतात. त्यावेळी बोटीवर हे प्रेमीयुगुल रोमॅन्टिक पोज देत आपलं प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात. सुझीला प्रपोज करण्याची ही योग्य वेळ आहे, असं स्कॉटला वाटतं. त्यानंतर तो खिशात ठेवलेला अंगठीचा बॉक्स बाहेर काढतो पण त्याचक्षणी तो बॉक्स महासागराच्या पाण्यात पडतो. क्षणाचाही विलंब न लावता तो थेट महासागरात उडी मारतो. स्कॉटचं नशीब एव्हढं भक्कम की, पाण्यात पडलेली अंगठी त्याला पुन्हा परत मिळते. हा सर्व प्रकार घडल्यानंतर त्याच्या प्रेयसीला खूप हसू येतं. हे 100 टक्के खरं आहे, 100 टक्के विसरणार नाही, असं कॅप्शन देऊन स्कॉटने ही पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे.
इथे पाहा व्हिडीओ
स्कॉटने न्यूयॉर्क पोस्टशी बोलताना म्हटलं की, “पाण्यात अंगठी पडल्यानंतर सर्व काही अदृष्य दिसत होतं. हे असं घडलं नाही पाहिजे, असं मला वाटत होतं. पण मी पाण्यात उडी मारायला जराही घाबरलो नाही. कारण अंगठी पाण्यात बुडणार असल्याची कल्पना होती आणि मला अंगठी परत मिळवायची होती. फुप्फुसात पाणी गेल्यानं मला थोडी भीती वाटत होती. पण पाण्यात पडलेली अंगठी सापडल्यानंतर काळजी करण्यासारखं मला काहिचं वाटलं नाही.”