सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. हल्ली तरुण नोकरीच्या मागे न लागता थेट स्वत:चा व्यवसाय करण्याचा पर्याय निवडतात. मग यावेळी मार्केटमध्ये आपलं नाव होण्यासाठी झटपट काय करता येईल, कशाप्रकारे मार्केटींग करायची याचा विचार सगळेच करत असतात.मार्केटींगसाठी नवनवीन संकल्पना राबविणारे आपल्याकडे काही कमी नाहीत, दरम्यान आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यात काही तरुणांनी भन्नाट मार्केंटींग केल्याचं पाहायला मिळतंय. तुम्ही आतापर्यंत MBA चहावाला, बीटेक पाणीपुरीवालीचं नाव एकलं असेल पण आता मार्केटमध्ये एकाने आपल्या अत्यंत महागड्या ऑडीमधून चहा विक्रीचा धंदा सुरू केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

थेट ऑडीतून चहाची विक्री

आजपर्यंत आपण रस्त्यावर MBA चायवाला, ग्रॅज्युएट चायवालीपासून चहा विकणारे अनेक लोक पाहिले आहेत. मात्र ऑडीसारख्या इतक्या महागड्या गाडीतून चहा विकाणारा हा पहिलाच प्रकार. ही ऑडी कार पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. एक व्यक्ती ऑडी कारजवळ चहा विकताना दिसत आहे. या कारजवळ उभे राहून काही लोक चहासुद्धा पीत आहेत.या ऑडी कारजवळ चहाचं सामानही ठेवण्यात आलं आहे. सर्वांचे लक्ष वेधून घेणारा हा व्हिडिओ ashishtrivedii_24 नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओला सोशल मिडीयावर मजेशीर प्रतिक्रीया आल्या आहेत.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – अजब गजब! जेल की ५ स्टार हॉटेल? चिकन, मासे, गुलाबजाम, जिलेबीसारखे मिळतात टेस्टी पदार्थ

नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रीया देताना याला , ऑडी चायवाला असे नाव दिले आहे. तर इतर तरुणांनी फनी कमेंट दिल्या आहेत. एकाने म्हटले आहे की ऑडी कार खरेदी केली आता हप्ते भरण्यासाठी चहा विकण्याची वेळ आली आहे. अन्य एका युजरने म्हटले आहे की, कारचा मालक ऑडीमधून चहा विकून मर्सिडीज-बेंझ जी वॅगन खरेदी करण्याची योजना आखत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत २ मिलियनहून अधिक व्ह्यूज गेले असून १ लाख ५३ हजार लोकांनी लाईक्स केले आहे.