Stunt video: काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. ही मंडळी संधी मिळताच चित्रविचित्र स्टंट मारून लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. पण ही स्टंटबाजी काही वेळेस अंगाशी सुद्धा येते. स्टंटबाजांना नको त्या ठिकाणी मार बसतो आणि आयुष्यभरासाठी अपंगत्व येतं. वाहतुकीचे नियम मोडून रस्त्यावर वाहनांची भन्नाट स्टंटबाजी करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. पण व्हिडीओच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्यासाठी धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्यांना चांगलीच अद्दलही घडल्याचे व्हिडीओ अनेकदा समोर आले आहेत. असाच काहीसा प्रकार या तरुणासोबत घडला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्याच्या काळात अनेक लोकांना सोशल मीडियावर काहीही करून फेमस व्हायचे असते. यासाठी ते काहीही करायला तयार असतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, स्टंटबाजी करताना आजूबाजूला खूप गर्दी दिसत आहे. यात बरेच जण स्टंटबाजी करत आहेत. मात्र या तरुणाचा स्टंटबाजी करताना अपघात होतो. स्टंटसाठी हा व्यक्ती त्याच्या बाईकचं पुढचं चाक हवेत उंचावताच त्याचा तोल बिघडतो. व्हिडिओ पाहून आपण अंदाज लावू शकतो, की तो तरुण ज्या पद्धतीने पडला, त्यावरून त्याला गंभीर दुखापत झाली असावी. याठिकाणी त्याने स्वत:चं नुकसान तर केलंच शिवाय समोरून येणारा दुचाकीस्वारही त्याच्या गाडीच्या धडकेत खाली पडला .

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> पती, पैसा अन् मर्डर…पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट; कॉफीमध्ये मिसळले ‘ब्लीच’, घटनेचा VIDEO आला समोर

दिवसेंदिवस याची क्रेझ वाढत चालली आहे. प्रसिद्धी झोतात येण्यासाठी तरुण मुले, मुली, मजेशीर, विचित्र, धोकादायक, स्टंट व्हिडीओ बनवतात. याला नेटकऱ्यांचे लाखो व्ह्युज मिळतात.