Viral video: अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नये हे लहानपणी शिकवले जाते. पण आजकाल मुलं या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. त्याचे परिणाम त्यांना नंतर भोगावे लागतात. काही वेळा अज्ञात व्यक्ती तुम्हाला फसवतात. असाच काहीसा प्रकार व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत दिसत आहे.चोर आता नवनवीन आयडीया शोधून काढतात, खिडकीजवळ दरवाजाजवळ बसलेल्या प्रवाशांचे मोबाईल हे चोर सराईतपणे हिसकावून चोरी करतात. मात्र आता समोर आलेला चोरीचा प्रकार तुम्हीही याआधी कधी पाहिला नसेल. तसेच मस्करीची कुस्करी कशी होते हे सुद्धा यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक मुलगी ऑटोतून जात आहे. यावेळी रस्त्यावरुन बाईकवर जाणाऱ्या अनोळखी मुलांसोबत ती मस्करी करते. यानंतर काय होतं ते पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक मुलगी ऑटोमधून कुठेतरी जात आहे. तेवढ्यात मुलीच्या शेजारी दुचाकीवरून दोन मुले येतात. एक मुलगा मुलीला सांगतो. मला तुझा मोबाईल नंबर मिळू शकेल का? मुलगी उत्तर देते होय, नक्कीच. यानंतर मुलगा मुलीला सांगतो. तुम्ही मला तुमचा फोन द्या आणि मी तुमच्या फोनमध्ये माझा नंबर टाईप करेन.यानंतर मुलगी तिचा फोन मुलाला देते. मुलीने फोन देताच. मुलगा फोन घेऊन पळू लागतो. यानंतर तरुणीला काहीच कळत नाही. अशाप्रकारे अनोळखी तरुणावर विश्वास ठेवणे तरुणीला चांगलंच महागात पडलंय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> रायगडा थोर तुझे उपकार…दिवसभर पोटाची खळगी भरणाऱ्या रायगडाचे महिलेने मानले आभार; VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ @amaar_bapa नावाच्या पेजने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत ५ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. यावर लोकांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. कमेंट करताना एका युजरने लिहिले की, ‘चोरीची पद्धत थोडी वेगळी आहे.’ आणखी एका युजरने लिहिले आहे, ‘परत देशील फोन पोरांना’ दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की, ‘खूप छान, फोन विका आणि जा पार्टी करा.’

Story img Loader