Viral video: जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना इंजेक्शन मिळण्याची भीती वाटते. लहान मुले थोडी घाबरलेली असली तरी मोठ्यांचाही यात सहभाग असतो. खरं तर, लोकांच्या मनात एक फोबिया असतो की, इंजेक्शन घेतल्याने खूप वेदना होतात. इंजेक्शन घेताना अनेकदा लहान मुलं ओरडतात आणि खूप रडतात. तुम्ही हेही पाहिलं असेल की, अनेक मुलं इंजेक्शन बघताच रडू लागतात आणि ते घेतल्यानंतर इतक्या जोरात रडू लागतात की आई-वडीलही बेचैन होतात. मात्र आता समोर आलेल्या एका मुलाचा इंजेक्शन देतानाचा व्हिडीओ बघून तुम्हीही पोट दुखेपर्यंत हसाल.

लहान मुलं खूपच गोड असतात. त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू नेहमी टिकून रहावं यासाठी त्यांचे आईवडील आणि सगळे कुटुंबीय फारच फारच मेहनत घेतात. पण लहान मुलांना डॉक्टरकडे नेण्याची वेळ आली आणि त्यातून त्यांना इंजेक्शन टोचायचं असेल तर सगळंच कठीण होऊन बसतं. एकदा डॉक्टरने इंजेक्शन दिलं की, ही मुलं मोठ्यानं भोकाड पसरतात. सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्येही असंच काहीसं पाहायला मिळालं आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात एक लहान मूल दिसत आहे. मुलगा डॉक्टरकडे गेला आहे. डॉक्टर मुलाला इंजेक्शन देतात. यानंतर मुलगा जे काही करतो हे पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरता येणार नाही. जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा डॉक्टर औषधे देतात किंवा अनेकदा काही प्रसंगी डॉक्टर आपल्याला इंजेक्शनही देतात. जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना इंजेक्शनची भीती वाटते. आणि विशेषत: मुलं इंजेक्शनच्या नुसत्या उल्लेखाने पळू लागतात. असाच काहीसा प्रकार व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत दिसत आहे. व्हिडिओमध्ये एक डॉक्टर आणि एक व्यक्ती दिसत आहे. तर तिथे टेबलावर एक मुलगा आडवा पडलेला दिसत आहे. डॉक्टर मुलाला इंजेक्शन देण्याची तयारी करत आहेत. त्याने मुलाला इंजेक्शन देताच. मूल खूप जोरात ओरडते आणि रडायला लागते. पण इंजेक्शन नंतर तो उठतो आणि ओके ओके म्हणू लागतो. हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> PHOTO: “तिच्या बापानं अजून मुंबई नाही पाहिली अन् जावई…” पुणेरी तरुणानं प्रचंड अपेक्षा करणाऱ्या मुलींना दिलं चोख उत्तर

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @ChapraZila नावाच्या खात्यावर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत २.४६ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. यावर लोकांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यावर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘बहुत हिम्मत वाला है ये बच्चा OK Ok.’ दुसऱ्या युजरने कमेंट करून लिहिलं, ‘हे होऊ दे.’ याशिवाय अनेकांनी या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रकारच्या मजेदार इमोजीसह प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Story img Loader