Shocking video: मोबाईल वापराचे वाढते व्यसन किंवा ॲडिक्शन ही आजच्या काळातील मोठी समस्या बनली आहे. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये संपूर्ण शिक्षण व्यवस्था ऑनलाइन मोडवर असताना, त्याच काळात मुलांच्या हातातही मोबाईल पडल्याने त्यांना मोबाईनलच्या वापराची घातक सवय लागली आहे.मोबाईलचे व्यसन हे अत्यंत धोकादायक बनले आहे, त्यामुळे मुलांच्या शिक्षणावरही त्याचा परिणाम होत आहे. मोबाइलचं व्यसन लागल्यामुळे मुलांना आजूबाजूला नेमकं काय घडतंय हेदेखील कळत नाही. याच व्यसनामुळे मुलं चुकीच्या मार्गालादेखील लागतात. सध्या असाच एक भयंकर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक मुलगा मोबाईलच्या इतक्या आहारी गेलाय की त्याची अवस्था भयंकर झाली आहे.नेमकं काय घडलंय या मुलाबरोबर, हे जाणून घेऊ या…

आजच्या जगात लहान मुलांना मोबाईलचं व्यसन आहे यात काहीच नवीन नाही परंतु या व्यसनामुळे मुलांच्यात शारिरिक आणि मानसिक बदल झाले आहेत. अनेकदा मोबाईलच्या अती व्यसनामुळे मुलांमध्ये चिडचिड आणि रागीटपणा वाढला आहे आणि त्याचे परिणाम आज पालकांना भोगायला लागत आहेत.लहान किंवा किशोरवयीन मुलंच नाही तर जो कोणी पाहतो तो तासन्तास मोबाईलमध्ये मग्न असतो. मोबाईलचे फायदे तर आहेतच पण त्याचबरोबर तोटेही आहेत म्हणूनच मुलांना मोबाईलचे व्यसन लागू नये हे महत्त्वाचे आहे. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जो पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता,एक मुलगा घराच्या गॅलरीमध्ये खुर्चीवर बसून मोबाईमध्ये गेम खेळत आहे. यावेळी अचानक त्याच्या हातातला मोबाईल खाली टाकतो आणि डोळे मान वर करत खाली पडतो. मोबाईलच्या अतिवापरामुळे त्याची ही अवस्था झाल्याचं दिसत आहे. यावेळी त्याचे पालक धावत येतात आणि त्याला उचलतात.हा व्हिडीओपाहून नक्कीच तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. मुख्य म्हणजे हा व्हिडीओ आपल्या सगळ्यांसाठी डोळ्यात अंजन घालणारा आहे. या व्यसनाचे बळी केवळ लहान मुलेच नाहीत तर तरुणांपासून ते वृद्धांपर्यंतही आहेत. त्यामुळे विशेषतः लहान आणि किशोरवयीन मुलांचे मोबाईलचे व्यसन आपण सोडलं नाहीत तर त्याचं घातक परिणाम नक्कीच होऊ शकतात.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ unbelievabletruth_ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरा वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत चिंता व्यक्त करत आहेत.