Viral video: सोशल मीडियाचे जग मजेदार फोटो आणि प्राण्यांच्या व्हिडीओंनी भरलेले आहे. ज्या लोकांना प्राण्यांची खूप आवड आहे, ते अनेकदा त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर बघण्यात घालवतात. असे लोक पाळीव प्राण्यांना घरातील सदस्य मानतात आणि त्यांना सांभाळतात. तर असेही काही लोक आहेत, जे या मुक्या प्राण्यांना त्रास देण्याचा आनंद घेतात. असे लोक केवळ त्यांना हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत नाहीत तर त्यांना विनाकारण त्रास देतात. मात्र, कधीकधी अशा लोकांना परिणामांनाही सामोरे जावे लागते. सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्येही एका व्यक्तीला गाईला त्रास देणं चांगलंच अंगलट आलं आहे. या व्यक्तीने गाईला विनाकारण त्रास दिला, मात्र त्यानंतर याचे परिणाम त्याला भोगावे लागले. त्याला त्याच्या या वागणुकीची अशी शिक्षा मिळाली की यापुढे तो प्राण्यांना त्रास देण्याचा विचारही करणार नाही.
या व्हिडीओमध्ये तु्म्ही पाहू शकता, एक रिकामा रस्ता दिसत आहे आणि रस्त्याच्या कडेला दोन गाई जात आहेत. यावेळी एक तरुण या गाईंना पाहून पुढे येतो आणि त्यांना दगडं मारू लागतो. पहिल्यांदा तो दगड मारतो तेव्हा गाई पुढे जातात मात्र दुसऱ्यांदा हा तरुण पुन्हा दगड मारतो आणि गाय पिसाळते. यावेळी गाय या तरुणावर जोरदार हल्ला करत त्याच्या मागे पळते, हा तरुण पुढे आणि गाय मागे असं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. शेवटी हा तरुण खाली पडतो आणि गाय त्याला तडवून पुढे जाते. कुणाला विनाकारण त्रास दिल्यावर काय होतं हे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं. तुम्हीही हा व्हिडीओ पाहा आणि सांगा यावर तुम्हाला काय वाटतं?
हा व्हिडीओ तुम्हीही पाहा आणि सांगा, पाळीव प्राण्यांना अशाप्रकारे त्रास देणं कितपत योग्य आहे?
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> मुंबईकरांचा नाद नाय! लोकलमध्ये साजरी केली जबरदस्त दिवाळी; प्रत्येक मुंबईकरानं पाहावा असा VIDEO
“जेव्हा कर्माचे फळ लगेच मिळते”
सोशल मीडियावर हा व्हिडीओ _rocker_girl_74 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.. हा व्हिडीओ कुठला आहे याबाबत काहीच माहिती हाती आली नाही. पण, हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. अनेक युजर्स त्यावर कमेंटदेखील करत आहेत. गाय तापली, कर्म, जन्माची अद्दल घडली, जेव्हा कर्माचे फळ लगेच मिळते अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया या व्हिडीओवर नेटकरी देत आहेत.