Viral video: सोशल मीडियावर दिवसभरात भरपूर व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे व्हायरल व्हिडीओ पहायला मिळातात. मजेशीर, भावनिक, विचित्र, धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. मात्र काही काळापासून असे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत ज्यामध्ये अचानक लोकांचे मृत्यू होत आहेत. हल्ली हृदयविकाराच्या झटक्याद्वारे मृत्यूने झडप घालण्याचे प्रमाण वाढले आहे. अलीकडच्या काळात सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत; ज्यात अनेकांचा अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे जीव गेल्याचे दिसून येते. याचदरम्यान आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये एका व्यक्तीचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू झाला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या व्हिडीओतून सकाळी घराबाहेर गेलेली व्यक्ती पुन्हा घरी येईल की नाही याची शाश्वती नसते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
हल्ली हृदयविकाराच्या झटक्याद्वारे मृत्यूने झडप घालण्याचे प्रमाण वाढले आहे. अलीकडच्या काळात सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत; ज्यात अनेकांचा अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे जीव गेल्याचे दिसून येते. याचदरम्यान आंध्र प्रदेशातून आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये एक तरुण मित्राच्या लग्नाला गेला होता, यावेळी मित्राला गिफ्ट देण्यासाठी स्टेजवर गेला आणि पुढच्याच क्षणी अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, स्टेजवर मित्राला गिफ्ट देण्यासाठी सगळे गेले आहेत. यावेळी ग्रे रंगाचं टी-शर्ट घातलेला तरुणही तिथे उभा आहे. सगळे आनंदात असताना अचानक तो तरुण डोक्याला हात लावतो आणि खाली कोसळतो. हे पाहून सगळे त्याला सावरतात आणि एका बाजूला घेऊन जातात. मात्र मिळालेल्या माहितीनुसार त्याला हृदयविकाराचा झटका आला अन् त्याचा मृत्यू झाला. या तरुणाला ज्याप्रकारे मरण आलं आहे हे पाहून असा शेवट कुणाचाही होऊ नये असं तुम्हीही म्हणाल. जेवताना, व्यायामशाळेत व्यायाम करताना किंवा नाचत असतानाही लोकांचा अचानक मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या. यामध्ये आता आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे.
पाहा व्हिडीओ
कधी कोणावर कोणती वेळ येईल हे सांगता येत नाही. हृदयविकाराचे झटके येण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हल्ली अनेकांना कोणत्या परिस्थितीत कधी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू येईल ते सांगता येत नाही. अलीकडच्या काळात सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत; ज्यात लोकांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि जीव गेला, अशी परिस्थिती उदभवल्याचे दिसते.