रस्त्यावर बाईकची स्टंटबाजी करून सोशल मीडियावर हिरोगिरी करणाऱ्या तरुणांना आपण नेहमी पाहतो. पण, एखाद्या मुलीला इम्प्रेस करायचं झालं, तर हीच तरुण मुलं कोणती हद्द पार करतील, याचा काही नेमंच राहिला नाहीय. बॉलिवूडचे चित्रपट पाहून आताची तरुणपिढी नवनवीन कारनामे करायच्या विचारात असते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. एका तरुणाने बाईकवर स्टंटबाजी करून एका मुलीला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न केला. परंतु, सर्वकाही त्याच्या मनासारखं घडलं नाही आणि त्याने केलेली स्टाईल त्याच्याच अंगलट आली.
तरुणाचा झाला घोर अपमान
एक मुलगा दुचाकीवर स्वार होत असताना काही अतंरावर रस्त्यावर उभ्या असलेल्या तरुणीला इम्प्रेस करायला जातो. तरुणीला इम्प्रेस करण्याची त्याची स्टाईलही भन्नाट असते. हा तरुण बाईकवरून खतरनाक स्टंटबाजी करून या तरुणीला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असतो. बाईकवर स्टॉपी स्टंट मारून तरुणीच्या समोर जातो. पण त्यानंतर तोल गेल्यामुळं तो खाली पडतो. त्यामुळं स्टाईल मारायला गेलेल्या या तरुणाची चांगलीच फजीती होते. हा व्हिडीओ इतका मजेशीर आहे की, तुम्हाला पाहायला नक्की आवडेल.
सोशल मीडियावर हा फनी व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. बाईकवर स्टंटबाजी करुन रस्त्यावर उभ्या असलेल्या तरुणीला इम्प्रेस करण्याच्या नादात तो स्वत:चीच फजीती करुन घेतो. सर्व काही त्याच्या रणनीतीनुसार होत असतं, पण ऐनवेळी तो बाईकवरू खाली पडतो आणि तरुणीसमोर केलेल्या हिरोगीरीत तो सपशेल अपयशी होतो.