वेगवेगळ्या प्रकारच्या खोड्यांचे म्हणजेच प्रँकचे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. हे व्हिडीओ देखील खूप मजेदार असतात. पण कधी कधी प्रँक व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीसोबतच असे काही घडते ज्याचा त्याने कधी विचारही केला नसेल. आजकाल असाच एक प्रँकचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला नक्कीच हसू येईल.
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगा एका मुलीसोबत प्रँक करायला जातो. एखाद्या रिपोर्टरप्रमाणे, मुलाने हातात माईक धरला आहे. तो मुलीशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. पण मुलगी म्हणते, “तू मला रिप्लाय देत नाहीस. तुला माहीत आहे, मला तू खूप आवडतोस…” यावर मुलगा थोडा लाजतो. तो तिला टाळण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, “आपण शूट करत आहोत. ..”
यानंतर मुलगी पुन्हा म्हणते, “मला तू आवडतेस… खरं तर, मी तुझ्यावर प्रेम करते.” यावर मुलगा खूप लाजतो कारण हे सर्व शूट होत असते. तो म्हणतो की आपण आधी शूट केले पाहिजे. यावर ती मुलगी पुन्हा म्हणते, “माझं तुझ्यावर प्रेम आहे… तुझं आहे की नाही?” यावेळी मुलाला काही समजत नाही, तो काहीच बोलू शकत नाही. यानंतर मुलगी पुन्हा म्हणते- “हो किंवा नाही सांग.” शेवटी मुलगा म्हणतो, “ठीक आहे, ठीक आहे… होय… नाही कोण म्हणतो.”
इवल्याशा बदकाने वाघाला ‘असे’ बनवले मूर्ख; Viral Video पाहून तुम्हालाही येईल हसू
यानंतर मुलगी त्या मुलाला सांगते की ती प्रँक करत होती आणि कोणीतरी तिचा व्हिडीओही बनवत होता. हे ऐकून त्या मुलाचा चेहरा पाहण्यासारखा होतो. मुलाला मुलीकडून जशास तसे उत्तर मिळते. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही नक्कीच हसाल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून तो इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. अनेक लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे. यावर यूजर्स खूप मजेशीर कमेंट करत आहेत.