Viral Video: स्टंटबाजी करणाऱ्या लोकांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यात लोक एकापेक्षा एक धोकादायक स्टंट करताना दिसतात. या स्टंटबाजांवर पोलिसांकडून अनेकदा कारवाई केली जाते; पण लोक अशी कृत्ये करण्यापासून परावृत्त होत नाहीत. प्रसिद्ध होण्याचे भूत त्यांच्या मानेवर असे काही बसलेले असते की, त्याशिवाय त्यांना दुसरे काहीच काम नाही, अशा रीतीने ते वागतात. असाच स्टंट करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; ज्यात भररस्त्यात स्टंटबाजी करीत रील बनविणाऱ्या तरुणाला लोकांनी कसा धडा शिकवला हे दाखवले आहे.

सार्वजनिक ठिकाणी स्टंट करणाऱ्या तरुणाची स्कुटी उचलून लोकांनी उड्डाणपुलावरून खाली फेकली. या घटनेच्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सोशल मीडियावरील रील्ससाठी तुमकुरू राष्ट्रीय महामार्गावर एक तरुण स्कुटी घेऊन स्टंटबाजी करीत असल्याचे दिसत आहे. यावेळी रस्त्यावरील संतप्त जमावाने स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाला कडक इशारा देत, त्याची स्कुटी उचलून उड्डाणपुलावरून खाली फेकून दिली.

What Sushma Andhare Said?
Badlapur Crime : “बदलापूरचा नराधम अक्षय शिंदे ऐवजी अकबर खान किंवा शेख असता तर..”, सुषमा अंधारेंचं वक्तव्य
11th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
११ सप्टेंबर पंचांग : प्रीती योग कोणाच्या नशिबाचे उघडणार कुलूप? व्यवसायात लाभ तर मान-सन्मानात होईल वाढ; वाचा तुमचे भविष्य
Badlapur school sexual abuse case Railway Station Protest
Badlapur sexual abuse case: बदलापूर रेल्वे स्थानकावरील आंदोलन पूर्वनियोजित; पोलिसांची माहिती
Rape of a school girl by giving her alcohol crime against minors and friends
शाळकरी मुलीला दारू पाजून बलात्कार, अल्पवयीनांसह मैत्रिणीविरुद्ध गुन्हा
Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड
Badlapur School Case Updates in Marathi
Badlapur Sexual Assault : “बदलापूर प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम मान्य नाहीत, ते…”; ठाकरे गटातील नेत्याचा कठोर विरोध!
waterspout sisli yacht sink
वॉटरस्पाउट म्हणजे काय? त्यामुळे इटलीतील समुद्रात जहाज कसे बुडाले?
School Male Cleaner Abuse Girls in Badlapur
Badlapur School Case : “दादाने माझे कपडे काढले”, बदलापूर अत्याचार प्रकरणातील घाबरलेल्या मुलीने पालकांना दिली होती माहिती; FIR मध्येही नोंद!

संतप्त लोकांनी रिल्स बनवणाऱ्या तरुणाची फेकली स्कुटी

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, उड्डाणपुलावर लोकांचा मोठा जमाव जमला आहे आणि त्यातील व्यक्ती तरुणाची स्कुटी उचलून, ती खाली फेकताना दिसत आहेत. यावेळी उड्डाणपुलाच्या खाली उभे असलेले लोक शांतपणे उभे राहून त्यांच्याकडे पाहत आहेत.

Read More Trending News : बंद कार ढकलण्याची ही कोणती पद्धत? Viral Video पाहून युजर्स चकित; म्हणाले, “जुगाड टॅलेंट…”

“शाब्बास! रील बनवणाऱ्यांना असा; धडा शिकवला पाहिजे”, युजर्सच्या कमेंट्स

हा व्हिडीओ @munsifdigital नावाच्या ट्विटर अकाउंटवरून व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स करून आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कमेंट करताना एका युजरने लिहिले की, लोकांनी हे चांगले केले नाही. दुसऱ्या युजरने लिहिले की, हे रीलवाले त्यांचे, तसेच इतर लोकांचे जीव धोक्यात घालत आहेत. त्यांना धडा शिकवला नाही, तर मोठा धोका निर्माण होऊ शकतो. तिसऱ्या युजरने लिहिले की, शाब्बास! रील बनवणाऱ्यांना असा; धडा शिकवला पाहिजे. कारण- तरच ते भानावर येतील.