Man Dances On Tip Tip Barsa Pani Song Video Viral : सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून डान्सचे जबरदस्त व्हिडीओ व्हायरल होत आहेत. आताही अशाच प्रकारचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्याने पाण्याला आग लावली आहे. अभिनेत्री रवीना टंडन स्टारर ‘टिप टिप बरसा पाणी’ या गाण्यावर एक तरुणाचे चक्क साडी नेसून भन्नाट डान्स केला आहे. या व्हिडीओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला असून नेटकऱ्यांनी त्या तरुणाच्या डान्स अदांचं कौतुक केलं आहे. कारण या गाण्यात एक मुलगी नाही तर तरुण मुलगा सुंदर नृत्य सादर करताना दिसत आहे.
इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये टिप टिप बरसा पाणी या गाण्यावर तरुण थिरकताना दिसत आहे. याआधीही अनेक गाण्यांमध्ये तरुणांनी महिलांचा वेश करून ठुमके लगावल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. पण या तरुणाच्या डान्समध्ये भन्नाट अदा आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून अनेक लोक चक्रावून गेले आहेत. त्या तरुणाचे हावभाव आणि डान्स करण्याची स्टाईल पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्या तरुणाने एक स्लीव्हलेस ब्लाऊज आणि पिवळ्या रंगाची साडी घातल्याचं व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ अमिद द शायनिंग स्टार नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
इथे पाहा व्हिडीओ
यूजर्स म्हणाले, याला म्हणतात पाण्याला आग लावणं
डान्स व्हिडीओत या तरुणाचे ठुमके पाहून तुम्हाला विश्वासच बसणार नाही की खरंच मुलगा आहे कि मुलाच्या वेशात महिला आहे. तरुणाच्या डान्स मूव्स आणि ठुमक्यांसोबतच त्याचं जबरदस्त हावभावही लोकांना पसंत आलं आहे. लोकांना चक्रावून टाकणारा हा व्हिडीओ इंटरनेटवर वेगानं व्हायरल होत आहे. लोक या व्हिडीओला प्रतिक्रियांचा वर्षाव करून तरुणाच्या डान्सचं कौतुक करत आहेत. एका नेटकऱ्याने म्हटलं, याला म्हणतात पाण्याला आग लावणं. तर दुसरा नेटकरी म्हणाला, या तरुणाच्या डान्स मु्व्जने मुलींना मागे टाकलं.