मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्या ऑक्सिजन प्लांटच्या उद्घाटनासाठी त्यांच्या सेनापती जिल्हाच्या दौऱ्याची बातमी देणाऱ्या एका लहान मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत आहे. खरं तर, बिरेन सिंग यांनीचं मुलाची छोटी क्लिप देखील ट्विट केली आहे आणि त्याचं कौतुकही केलं आहे. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर, बिरेन सिंग यांनी मणिपूरमध्ये वैद्यकीय ऑक्सिजनची पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी विविध जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन केले. बिरेन सिंग यांच्या जिल्ह्यात येण्यापूर्वी या लहान मुलाने एका पत्रकाराचे अनुकरण केले आणि एका इमारतीच्या गच्चीवर उभे राहून मुख्यमंत्र्यांच्या भेटीचे वृत्त दिले.
कसं सांगितलं वृत्त?
टीशर्ट आणि शॉर्ट्स घातलेला मुलगा व्हिडीओमध्ये हिंदीमध्ये बोलता दिसतो की, “इथे बरीच वाहने त्यांची वाट पाहत उभी आहेत. ते ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन करण्यासाठी आले आहेत. आमचे मुख्यमंत्री बिरेन सिंग, तुम्ही खूप चांगला विचार केला आहे. बिरेन सिंग यांच्यासाठी इथे अनेक गाड्या वाट पाहत आहेत. ते ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन करण्यासाठी आमच्या जिल्ह्याला भेट देत आहेत. बिरेन सिंग हे महान आहेत. यासह, आम्ही आता करोना विषाणूशी लढू शकतो.” असं बोलत तो वृत्त देतो.
बिरेन सिंग याचं ट्विट
“सेनापती येथील माझ्या तरुण मित्राला भेटा, जो सेनापती जिल्हा रुग्णालयातील पीएसए ऑक्सिजन प्लांटच्या उद्घाटनासाठी काल माझ्या जिल्ह्याच्या दौऱ्याची माहिती देत होता.” बिरेन सिंग यांनी आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. तसेच पोस्ट करताना श्री. नरेंद्र मोदी यांनाही टॅग केले आहे.
पोस्टला नेटीझन्सची पसंती
२ मिनिटे आणि १९ सेंकदाच्या या व्हिडीओला नेटीझन्सने भरभरून प्रेम दिल आहे. ही पोस्ट आतापर्यंत सुमारे ५०,००० व्ह्यूजसह व्हायरल झाली आहे, तर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी लहान मुलाला आणि त्याच्या रिपोर्टिंग कौशल्याला पाहून असंख्य कमेंट्स केल्या आहेत. “या तरुणाने माझा दिवस बनवा. हसणे थांबवू शकत नाही. कृपया त्याला तुमच्या राज्याचा कनिष्ठ राजदूत म्हणून नियुक्त करा. तो आधीच स्टार रिपोर्टर आहे. तो तुमच्या राज्यात पर्यटनासाठी एक उत्तम ब्रँड अॅम्बेसेडर बनेलं.” असं एका वापरकर्त्याने केमेंट केली. तर दुसरा वापरता कमेंट करतो की, “त्यांचे मातृभूमी आणि मुख्यमंत्री बिरेन सर यांच्यावरील प्रेम त्यांच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर प्रतिबिंबित होते. तुमच्या राज्यातील नवोदित तरुणांसाठी तुम्ही प्रेरणा आहात.”
Meet my young friend from Senapati who was reporting my visit to the district yesterday to inaugurate the PSA Oxygen plant at Senapati District Hospital.@narendramodi pic.twitter.com/agk5zch4A3
— N.Biren Singh (@NBirenSingh) August 10, 2021
तुम्हाला कसा वाटला हा व्हिडीओ?