Boycott India vs Pakistan World Cup 2023: विश्वचषक २०२३ साठी पाकिस्तानी संघ तब्बल ७ वर्षांनी भारतात आला आहे. आल्यापासूनच पाकिस्तानच्या खेळाडूंचा भारतात रीतसर पाहुणचार होत आहे. हैदराबाद मध्ये बिर्याणी पासून ते शाल-श्रीफळ देऊन सत्कारापर्यंत बीसीसीआयने बाबर आणि संघाची उत्तम सोय केली होती. याविषयी स्वतः बाबर आझम, शाहीन आफ्रिदी पासून प्रत्येकाने कौतुक करून आम्हाला घरीच आल्यासारखे वाटत आहे असे म्हटले होते. विशेषतः हैदराबादमध्ये खेळताना रावळपिंडीत असल्याचाच भास होत आहे असेही बाबर आझम म्हणाला होता. शनिवारी १४ ऑक्टोबरला होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी आता मेन इन ग्रीन अहमदाबादमध्ये पोहोचले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अहमदाबादमध्ये सुद्धा हैदरबादप्रमाणेच अगदी उत्साहात बाबर अँड कंपनीचं स्वागत झालं. ढोल- ताशे वाजवून गरबा करून पाकिस्तानी संघाचा हॉटेलमध्ये पाहुणचार झाला.पण यावरून भारतीय नेटकरी मात्र प्रचंड भडकले आहेत. पाकिस्तानच्या संघाचे एवढे चोचले पुरवणं म्हणजे आपल्या वीरसैनिकांचा अपमान आहे असं म्हणत सध्या ट्विटर (X) वर नेटकऱ्यांनी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना बॉयकॉट करण्याची मागणी सुद्धा केली आहे. अनेकांनी बीसीसीआयवर ताशेरे ओढून पाकिस्तानसह मैत्रीपूर्ण संबंध दाखवणं म्हणजे सीमेवर शहीद होणाऱ्या सैनिकांचा अपमान असल्याचे म्हटले आहे. काहींनी तर जय शाह, बीसीसीआय, व भारतीय खेळाडूंना टॅग करत आपल्याला लाज वाटली पाहिजे असे म्हटले आहे.

भारत पाकिस्तान सामन्याआधी बाबर अँड कंपनीचे स्वागत

नेटकरी बाबर आझम व संघाच्या स्वागतावर का भडकले?

दरम्यान, #BoycottIndovsPak या हॅशटॅगसह अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. दुसरीकडे काहींनी यावर प्रतिक्रिया देत पाहुणचार व आदरातिथ्य ही आपल्या देशाची परंपरा आहे आणि सीमेवरील वाद खेळाडू, कलाकार यांच्याशी विनाकारण जोडू नये असेही म्हटले आहे. तुम्हाला या एकूण वादावर काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Boycott india vs pakistan world cup 2023 netizens angry slams bcci jay shah for pakistani team welcome says be ashamed svs