सोशल मीडियावर दररोज कोणत्या ना कोणत्या गोष्टी ट्रेंड करत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी बॉयकॉट बॉलिवूड मोठ्याप्रमाणावर ट्रेंडिंग होते. मात्र आज सकाळपासून ट्विटरवर एक अनोखा ट्रेंड पाहायला मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर #BoycottMarriage चा ट्रेंड जोरात सुरू आहे. बॉयकॉट बॉलिवूड म्हणजे बॉलिवूडवर बहिष्कार घाला. मात्र, बॉयकॉट मॅरेज हा ट्रेंड जरा गोंधळात टाकणारा आहे. या मागचं कारण आपण जाणून घेऊया.
केरळ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मोहम्मद मुस्ताक यांची एक टिप्पणी व्हायरल होत असल्याने हा ट्रेंड सोशल मीडियावर वेगाने चालवला जात आहे. न्यायमूर्तींनी यापूर्वीही घटस्फोटाच्या प्रकरणावर विविध टिप्पण्या केल्या आहेत.
PAK vs SL Asia Cup 2022 : महत्त्वाच्या कॅच सोडलेल्या शादाब खानची भावुक पोस्ट; म्हणाला, “ही चूक…”
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका ट्विटमध्ये अशी माहिती देण्यात आली आहे की, उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी त्यांच्या बॅचमध्ये सुरू असलेल्या बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीत कलम ३७६ वर विधान केले आहे. ३७६ मध्ये स्त्री-पुरुष समानतेची तरतूद करण्यात आली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी म्हटलंय, ‘एखाद्या महिलेने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन पुरुषाची फसवणूक केली, तर तिच्यावर गुन्हा दाखल होत नाही. याउलट, जेव्हा एखादा माणूस असे करतो तेव्हा त्याच्यावर कारवाई केली जाते.’ मात्र नेटकऱ्यांच्या मते लिंगभेद करणे योग्य नाही. त्यामुळेच सोशल मीडियावर लग्नावर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड सुरू आहे.
युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत या ट्रेंडवर आपले मत देत आहेत. एका वापरकर्त्याने याला सहमती दर्शवली आणि मी सहमत असे लिहिले. दुसरीकडे, आणखी एक वापरकर्ता म्हणतो की समानता एक भ्रम आहे.