Boyfriend Beats Girlfriend Viral Video: मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात एका महिलेला तिच्या प्रियकराने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. ही संपूर्ण घटना व्हिडिओमध्ये कैद झाली आहे;. या व्हिडीओमध्ये जेव्हा ती तरुणी आपल्या प्रियकराकडे लग्नाचा विषय काढते तेव्हा तो माणूस इतका भडकतो की त्याच रागात तिला मारहाण करू लागतो. प्राप्त माहितीनुसार ही तरुणी अवघी १९ वर्षांची आहे. यात तिचा बॉयफ्रेंड निर्दयीपणे तिला कानाखाली मारताना दिसत आहे. इतकंच नव्हे तर ती तरुणी जमिनीवर पडताच तो तिच्या चेहऱ्यावर लाथ मारतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बॉयफ्रेंडच्या मारहाणीच्या कळवळून उठलेली तरुणी वेदनेने रडताना दिसते. पण तिच्या बॉयफ्रेंडला तिची अजिबात दया येत नाही उलट तो तिला आणखी शिवीगाळही करू लागतो.प्राथमिक माहितीनुसार, व्हिडिओमधील व्यक्ती मौगंज भागातील ढेरा गावातील रहिवासी आहे, असे पोलिस उपविभागीय अधिकारी (SDOP) नवीन दुबे यांनी सांगितले. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, पीडिता आणि आरोपी यांचे नातेसंबंध होते आणि त्यांच्यात वाद झाला, त्यानंतर त्याने तिला मारहाण केली.

दरम्यान, पीडितेने या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली मात्र कोणतीही तक्रार दाखल केली नाही. आरोपीला ताब्यात घेण्यात आले होते परंतु नंतर त्याला कलम 151 नुसार सोडून देण्यात आले. हे भयानक फुटेज व्हायरल झाल्याने पोलिसांनी आता त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले असून तो संबंधित आरोपी सध्या फरार आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीविरुद्ध कलम ३२३ आणि भारतीय दंड संहितेच्या इतर संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला.

हे ही वाचा<< Video: भररस्त्यात बाईकवर बेभान जोडप्याने ओलांडल्या सर्व मर्यादा; ‘जो’ मध्ये पडला त्याची अशी झाली अवस्था..

दरम्यान अलीकडेच देशभरात गाजलेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडात सुद्धा अशाच प्रकारे वादाला सुरुवात झाली होती. आफताब पुनावाला याच्या माहितीनुसार श्रद्धाने लग्नाचा हट्ट धरल्याची चर्चा होती. या प्रकरणात अद्याप न्यायनिवाडा झाला नसला तरी हीच प्रवृत्ती या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा दिसत आहे.