Viral video: एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेली अनेक जोडपी तुम्ही पाहिली असतील. अशी अनेक जोडपी असतात ज्यांना घरातून नात्यासाठी परवानगी नसते. अशावेळी जगाची पर्वा न करता ही जोडपी गुपचूप एकमेकांना भेटतात. मांजर दुध पिताना डोळे बंद करून पिते म्हणून तिला वाटते की मला कोणीही पाहत नाही” मात्र तिला सगळे पाहत असतात. असंच काहीसं या प्रेमात पडलेल्या तरुणाईचं असतं. या वयात त्यांना प्रेमापुढं अख्खं जग फिकं वाटतं. अशावेळी घरच्यांच्या विरोधामुळे पळून गेलेली अनेक जोडपी तुम्ही पाहिली असतील. अशाच एका जोडप्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. खरंतर एका बॉयफ्रॉडने आपल्या गर्लफ्रेंडला लग्नाच्या मंडपातून पळवून नेलं. ते ही सर्वांच्या समोर. लोक पाहण्याशिवाय दुसरं काहीही करु शकत नव्हते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं काही सेम असतं असे म्हणतात ते काही खरं नाही. बहुतेकदा मुलांच्या लवस्टोरीला घरच्यांचा विरोध असतो. त्यामुळे ते पळून जावून लग्न करण्याचा मार्ग निवडतात. अलिकडच्या काळात लव्ह मॅरेजचे प्रमाण चांगलेच वाढले आहे.पण घरच्यांच्या मनाविरुद्ध जावून लग्न करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.सध्या सोशल मीडियावर अशाच एका पळून चाललेल्या तरुण- तरुणीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, भर लग्नमंडपात हा तरुण या तरुणीला आपल्या बाईकवरुन घेऊन जात आहे. तो गाडीवर वेगात तिला घेऊन जातो. यावेळी काही लोक त्याच्या मागे पळतानाही दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> अरे आवरा यांना! म्हशीच्या पाठीवर उभं राहून करतायत डान्स; VIDEO पाहून व्हाल हैराण

नेटकऱ्यांनीही त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या असून अनेक अजब सल्लेही तरुणाला दिले आहेत. काही जणांनी पळून जायच्या आधी गाडीतरी.. सर्विसिंग करायची अशी मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे तर अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Boyfriend came in mandup and run away with girlfriend on bike shocking video trending on social media srk