Viral Video : प्रेम हे जगातील सर्वात सुंदर भावना आहे. आई मुलामध्ये असलेले प्रेम असो किंवा बहीण भावातील प्रेम असो, नवरा बायकोमधील प्रेम असो किंवा प्रियकर प्रेयसीमधील प्रेम असो, प्रेम हे प्रेम असतं. प्रेमासाठी जीव देणारे, त्याग करणारे अनेक प्रकरणे तुम्ही ऐकले असतील पण हल्ली प्रेमाची व्याख्या बदलताना दिसत आहे. विशेषत:प्रियकर आणि प्रेयसीच्या नात्यात हिंसाचार आणि अत्याचार वाढला आहे. कोणत्याही रिलेशनशिपमध्ये प्रेम आणि विश्वास असणे गरजेचे असते. मात्र अनेकदा अनेकदा रिलेशनशिपमध्ये असतानाही बॉयफ्रेंड अथवा गर्लफ्रेंड दुसऱ्याच व्यक्तीशी संबंध ठेवतात, एकमेकांची फसवणूक करतात. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.यामध्ये एका तरुणानं आपल्या गर्लफ्रेंडला दुसऱ्या तरुणाबरोबर रंगेहात पकडलं आहे. एवढचं नाही तर त्यानंतर या तरुणानं असं काही केलं की तुम्ही विचारही करु शकत नाही.

आयुष्याची कमाल आहे ना राव…आपल्याकडे कितीही असलं तरी अजून अजून गोष्टी हव्या असतात. आता या तरुणीचंच घ्या ना…एक बॉयफ्रेंड असताना ती दुसऱ्या तरुणासोबत फिरत होती. तिला जराही भीती नव्हती का? की आपला बॉयफ्रेंड पकडेल. त्यानंतर काय होईल याची…कदाचित नाहीच म्हणून ती बिनधास्त त्या तरुणासोबत होती. मात्र तिथे तिचा बॉयफ्रेंड येतो अन् मग काय घडतं पाहा.

a father cried a lot while giving send off to his daughter in wedding
शेवटी बापाचं काळजी ते! मुलीला सासरी जाताना पाहून भर मांडवात वडील ढसा ढसा रडले! बाप-लेकीचा Video होतोय व्हायरल
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Boyfriend surprises his blind girlfriend with a braille proposal video
याला म्हणतात खरं प्रेम! अंध गर्लफ्रेंडला बॉयफ्रेंडनं केलं अनोखं प्रपोज; VIDEO पाहून तरुणाचं कराल कौतुक
Little Boy Viral Video
“तू मोठा झाल्यावर किती बायका करणार?” चिमुकल्यानं दिलं भन्नाट उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल; VIDEO एकदा पाहाच
father daughter relation
“मुलीला तिच्या आयुष्यात वडीलाइतकं कोणीच समजू शकत नाही” पाहा बापलेकीचा हृदयस्पर्शी व्हिडीओ
Two girls fighting at collage over a guy shocking video viral on social media
प्रेमासाठी काय पण! एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
Young Girl Performs Lavani Dance
गौतमी पाटील तरुणीसमोर फेल! सादर केली सुरेख लावणी, VIDEO होतोय व्हायरल

आता तुम्हाला वाटलं असेल की तो तिच्यावर ओरडला असेल किंवा फार फार तर त्यानं तिच्यावर हात उचलला असेल. मात्र यातलं त्यानं काहीच केलं नाही तर फक्त फसवणूक करताना रंगेहाथ पकडल्यानंतर तरुणानं तिच्यावर ओरडणे सोडून तिची स्कूटर हिसकावून घेतली, जी तिने त्याला आधी गिफ्ट केली होती. प्रेमात असताना गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड एकमेकांना वेगवेगळे गिफ्ट्स देत असतात. असंच गिफ्ट या बॉयफ्रेंडनं त्याच्या गर्लफ्रेंडला दिलं होतं, मात्र तिनं फसवणूक केल्यानं त्यानं ती स्कूटर तिच्याकडून हिसकावून घेतली. व्हायरल व्हिडिओमध्ये मुलगा मुलीसमोर स्कूटर घेऊन उभा असल्याचे दिसत आहे. दरम्यान, दुसरा मुलगा दोघांच्या जवळ उभा असलेला दिसतो आणि दुसऱ्या मुलाला बाजूला होण्यास सांगतो. मुलगी स्कूटरची चावी परत मागताना ऐकू येते. काही वेळ वाद घातल्यानंतर तो मुलगा पुढे सरकतो आणि तिचे केस धरण्याचा प्रयत्न करतो. मात्र, दुसरा मुलगा त्याला तसे करण्यापासून थांबवतो. आता तुम्हीच सांगा बॉयफ्रेंडनं जे केलं ते बरोबर केलं का?

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> कावळा उड, चिमणी उड…खेळताना चिमुकल्या मुलींची झाली भांडणं; हा VIDEO पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @ShoneeKapoor नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.